Join us
Daily Top 2Weekly Top 5

कौन है ये चिकना! साडीत सुंदर दिसणाऱ्या या अभिनेत्याला ओळखलं? मराठी सिनेसृष्टीतला आहे हँडसम बॉय

By कोमल खांबे | Updated: May 7, 2026 10:27 IST

1 / 8
सोशल मीडियावर मराठी सेलिब्रिटींचे फोटो नेहमी व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका मराठी अभिनेत्याचा फोटो व्हायरल होतो आहे.
2 / 8
या फोटोमध्ये अभिनेत्याने साडी नेसून एका महिलेसारखा लूक केल्याचं दिसत आहे. फोटोत अभिनेत्याला ओळखणंच कठीण जातंय. एखादी सुंदर मुलगीच असल्याचं वाटत आहे.
3 / 8
फोटोतील हा अभिनेता म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून मराठीतला हँडसम बॉय सिद्धार्थ चांदेकर आहे.
4 / 8
सिद्धार्थने 'बालगंधर्व' सिनेमात असा लूक केला होता. या सिनेमाला १५ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने त्याने हा फोटो पोस्ट केला आहे.
5 / 8
'१५ वर्षांपूर्वी ह्या अजरामर सिनेमात काम करायची संधी मला मिळाली! बालगंधर्व! भूमिका छोटी पण आठवण आभाळा एवढी. मराठी नाट्य संगीताशी माझी पहिली ओळख इथेच झाली', असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.
6 / 8
सिद्धार्थ हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे.
7 / 8
'मिसेस देशपांडे' या अलिकडेच प्रदर्शित झालेल्या वेब सीरिजमध्ये त्याने माधुरी दीक्षितसोबत स्क्रीन शेअर केली होती.
8 / 8
अभिनेता असण्यासोबतच सिद्धार्थ एक कवीदेखील आहे. सोशल मीडियावरही तो प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं.
टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरमराठी अभिनेता