"लेस्बियन भूमिकेनंतर सतत तशीच विचारणा झाली पण...", बोल्ड सीन्सवर प्रिया बापटची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 16:05 IST
1 / 8मराठी अभिनेत्री प्रिया बापट हिंदीतही कमालीची सक्रीय आहे. एकापेक्षा एक हिंदी सिनेमा, वेबसीरिजमध्ये तिने काम केलं आहे.2 / 8प्रियाने 'सिटी ऑफ ड्रीम्स' या गाजलेल्या सीरिजच्या पहिल्याच सीझनमध्ये लेस्बियन किसींग सीन दिला होता. त्याची खूप चर्चा झाली. नंतर काही वर्षांनी नुकत्याच आलेल्या 'अंधेरा' सीरिजमध्येही तिने लेस्बियन किसींग सीन दिला.3 / 8या बोल्ड सीन्सवर प्रियाने नुकतीच प्रतिक्रिया दिली. 'नवशक्ती'ला दिलेल्या मुलाखतीत प्रिया म्हणाली, 'मी लेस्बियन भूमिका करतेय की सरळ भूमिका करतेय याला मी महत्व देत नाही. माझ्यासाठी पात्र नक्की काय आहे, गोष्टीत त्याचं काय काम आहे हे महत्वाचं आहे.'4 / 8'मलाही या भूमिका करण्यासाठी या स्टेजला यायला वेळ लागला. २०१३ मध्ये मी ऑनस्क्रीन उमेशलाच किस करायलाही घाबरत होते. तिथपासून आज दोन प्रोजेक्टमध्ये लेस्बियन सीन्स करणं इथपर्यंत पोहोचले आहे.'5 / 8'आयुष्यात तुम्ही जसे अनुभव घेता तसा तुमच्यातील संकोच गळून पडतो. ते करायला मिळतंय हा कधीच क्रायटेरिया नसतो. 6 / 8'मला आता बॅरियर्स ब्रेक करायचे हे कधीच माझ्या डोक्यात नव्हतं. कायम भूमिका काय आहे हाच फोकस असतो. पात्राचं कथानकात काय महत्व आहे हे मी पाहते.' 7 / 8'सिटी ऑफ ड्रीम्स पहिल्या सीझननंतर तशा भूमिकेची थोडी जास्त विचारणा झाली. पण काय करायचं काय नाही हे माझ्या डोक्यात फिक्स असेल तर कोणी मला फोर्स करु शकत नाही.'8 / 8' तीन चार वेळा सतत तशी विचारणा झाली पण मी तीनही वेळा नकार दिला. अंधेरा सीरिजमध्ये तशी भूमिका केली कारण तो एक्सेल एंटरटेन्मेंट चा शो होता. तो प्राईम व्हिडीओचा होता. मी शोची लीड होते. मला करायला मिळणारं पात्र मोठं होतं त्यामुळे ते लेस्बियन आहे का काय हे मला महत्वाचं वाटत नाही.'