By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 14:15 IST
1 / 9'चि.व चि.सौ का' मराठी सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री मृण्मयी गोडबोले. तिला आपण भाडिपाच्या 'आई, मी...' या सीरिजमुळेही ओळखतो.2 / 9मृण्मयी 'झिम्मा','विशू','अवांछित','राजवाडे अँड सन्स' या काही मराठी सिनेमांमध्येही दिसली. प्रत्येक भूमिकांमधून तिने प्रेक्षकांवर छाप पाडली.3 / 9मृण्मयी हिंदीतही सक्रीय असते. 'पॅडमॅन','ऐ जिंदगी' सिनेमांमध्ये ती होती. तसंच 'हाय','वन्स अ इयर' या वेबसीरिजमध्ये तिने काम केलं. 4 / 9मृण्मयी गोडबोलेच्या नवऱ्याचं नाव निखिल महाजन आहे. निखिल मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. जितेंद्र जोशीचा 'गोदावरी' गाजलेला सिनेमा त्यानेच दिग्दर्शित केला होता. यासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.5 / 9निखिलने इंटरनॅशनल फिल्म स्कुल सिडनी येथून पदवी घेतली आहे. त्याने फिल्ममेकिंगचं रीतसर शिक्षण घेतलं आहे. तसंच तो लेखक आणि निर्माताही आहे.6 / 9निखिलने 'पुणे ५२','रावसाहेब','बाजी','आय लव्ह यू' या सिनेमांचंही दिग्दर्शक केलं आहे. तर 'जून' या सिनेमाचं लेखन केलं आहे. 'ठाकरे' सिनेमात त्याने भूमिकाही साकारली होती. 7 / 9निखिलने काही वर्षांपूर्वी मृण्मयी गोडबोलेशी लग्न केलं. दोघांनी पुण्यात कोर्ट मॅरेज केलं होतं. दोघंही आपलं वैयक्तिक आयुष्य अतिशय खाजगी ठेवणंच पसंत करतात.8 / 9मृण्मयी ही ज्येष्ठ अभिनेते श्रीरंग गोडबोले यांची लेक आहे. तर तिचा भाऊ सुहृद गोडबोले हा दिग्दर्शक निर्माता आहे. सुहृदची पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री आणि आताची नॅशनल क्रश गिरीजा ओक गोडबोले आहे. 9 / 9निखिल आणि सुहृद जुने मित्र आहेत. त्यांनी अनेक प्रोजेक्ट्समध्ये एकत्र कामही केलं आहे. दोघांच्या सोशल मीडियावरुन त्यांच्या मैत्रीचा घट्ट बाँड दिसून येतो.