मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांची लेक दिसायला आहे खूप सुंदर, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 07:00 IST
1 / 10अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांनी अनेक मालिका आणि चित्रपटातही काम केले आहे. आजवर त्यांनी हिंदी, मराठी आणि इतर भाषांतही चित्रपट मालिका केल्या आहेत.2 / 10प्रतीक्षा लोणकर यांनी अनुभूती ही मराठी मालिका केली होती. त्यानंतर अन्न हे पूर्णब्रह्म हे मराठी कार्यक्रम देखील केला होता. त्यानंतर अर्थ नावाचे मराठी नाटक त्यांचे प्रचंड गाजले होते. आम्ही सौ कुमुद प्रभाकर आपटे हे नाटक हे त्यांचे लोकप्रिय ठरले. ऑल दि बेस्ट हे हिंदी नाटक त्यांचे खूप गाजले होते.3 / 10आशाये, इक्बाल यासारखे हिंदी चित्रपट त्यांचे लोकप्रिय ठरले. एवढेसे आभाळ या चित्रपटातून त्यांना एक वेगळीच लोकप्रियता मिळाली. कहानी नही जवानी है, हे हिंदी नाटक ही त्यांचं गाजलं होतं. कळत नकळत या नाटकात त्यांनी अफलातून काम केले.4 / 10गुडगुडी, खेळ सातबारा, दिनमान दुनिया, दुसरी गोष्ट, जोर, दौलत, नया नुक्कड, पिंपळपान, पुरुष, बंदिनी, बसेरा बिनधास्त, हमारी बहु को भरारी, भेट, मार्शल, मिसेस माधुरी दीक्षित, मीराबाई नॉट आऊट, मुंबई कटिंग, मोकळा श्वास, येळकोट यासारख्या बऱ्याच मराठी आणि हिंदी चित्रपटातही त्यांनी काम केले.5 / 10प्रतीक्षा लोणकर यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळून दिली ती दामिनी या मालिकेतून. दामिनी मालिकेत त्यांनी साकारलेल्या तडफदार दामिनीच सर्वत्र कौतुक झाले. 6 / 10प्रतीक्षा लोणकर यांनी प्रशांत दळवी यांच्याशी लग्न केले आहे. प्रशांत प्रतीक्षा यांना रुंजी नावाची मुलगी आहे.7 / 10प्रतीक्षा या सोशल मीडियावरचे फोटो शेअर करत असतात. बऱ्याचदा ते फॅमिलीसोबतचेही फोटो शेअर करत असतात.8 / 10प्रतीक्षा लोणकर यांची मुलगी रुंजीदेखील आईसारखीच दिसायला सुंदर आहे.9 / 10प्रतीक्षा लोणकर सध्या अबोली मालिकेत पाहायला मिळत आहेत. या मालिकेलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.10 / 10प्रतीक्षा यांनी मालिकेसोबतच इक्बाल, वॉन्टेड, नन्हे जैसलमेर अशा हिंदी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे.