श्रुती मराठेचा नवरादेखील आहे अभिनेता; दोघांनीही केलंय एकाच चित्रपटात काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 15:16 IST
1 / 9मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे. 'सनई चौघडे' या चित्रपटाच्या माध्यमातून २००९ मध्ये श्रुतीने कलाविश्वात पदार्पण केलं.2 / 9'असा मी तसा मी', 'लागली पैज सत्या', 'सावित्री आणि सत्यवान', 'रामा माधव' आणि 'तुझी माझी लव्हस्टोरी' अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकलेली श्रुती सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते.3 / 9रुपेरी पडद्यासह छोट्या पडद्यावरही झळकलेली श्रुती सध्या तिच्या नवऱ्यामुळेच चर्चेत येत आहे. अनेकदा श्रुती तिच्या नवऱ्यासोबतचे म्हणजेच गौरव घाटणेकरसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.4 / 9गौरव आणि श्रुतीने ४ डिसेंबर २०१६ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नसोहळ्याला कलाविश्वातील अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.5 / 9श्रुतीप्रमाणेच गौरवदेखील अभिनेता असून एका चित्रपटाच्या सेटवरच त्यांची मनं जुळल्याचं सांगण्यात येतं. 6 / 9'तुझी माझी लव्ह स्टोरी' या चित्रपटामध्ये श्रुती-गौरवने एकत्र स्क्रीन शेअर केली होती. त्याचवेळी त्यांची ओळख झाली आणि या ओळखीचं प्रेमात रुपांतर झालं.7 / 9गौरव घाटणेकर मराठी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील एक नावाजलेले नाव आहे. छोट्या पडद्यावरील ‘तुज विन सख्या रे’ या मालिकेतून गौरव घराघरांत पोहोचला होता.8 / 9गौरव घाटणेकर मराठी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील एक नावाजलेले नाव आहे. छोट्या पडद्यावरील ‘तुज विन सख्या रे’ या मालिकेतून गौरव घराघरांत पोहोचला होता. 9 / 9मराठी सिनेमा आणि हिंदी मालिकांबरोबरच हिंदी आणि उर्दू नाटकांतूनही त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.