Join us  

'या' 23 वर्षीय मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का? 'हॉटनेस'मध्ये बॉलिवूडला देतेय टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 12:18 PM

1 / 9
मराठी कलाविश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या बोल्ड आणि बिंधास्त फोटोंनी सर्वांचंच लक्ष वेधलंय. बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देतील असा त्यांचा फिटनेस आहे.
2 / 9
अशीच एक अभिनेत्री तिच्या फिटनेस आणि हॉट लूकमुळे अनेकदा चर्चेत असते. ही अभिनेत्री पुण्याची असून तिचं वय फक्त २३ वर्ष आहे. लहानपणीपासूनच अभिनयाची स्वप्न पाहणाऱ्या या अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये काम केलंय.
3 / 9
ही अभिनेत्री आहे रितीका श्रोत्री (Ritika Shrotri). 'बॉईज', 'टकाटक', 'सरी' अशा अनेक सिनेमांमधून तिने अभिनयाचं दर्शन घडवलं आहे.
4 / 9
रितीकाची सोशल मीडियावर खूप चर्चा असते. तिचा कमालीचा फिटनेस आणि बोल्ड फोटो चाहत्यांना भुरळ घालतात. महाराष्ट्राची क्रश असंही तिला म्हटलं गेलं.
5 / 9
तिने नुकतंच स्पोर्ट्स ब्रा आणि ब्लू डेनिम जीन्समध्ये मिरर सेल्फी पोस्ट केला. फिटनेसकडे वाटचाल करताना असं तिने कॅप्शन लिहिलं. रितीकाच्या या फोटोवर ढीगभर कमेंट्स आल्या आहेत.
6 / 9
सोशल मीडियावर रितीकाचे 5 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देईल असा तिचा फिटनेस आणि सौंदर्य आहे.
7 / 9
२०१७ साली आलेल्या 'स्लॅमबुक' सिनेमात तिने मुख्य भूमिका साकारली होती. गेल्या वर्षी तिचा 'सरी' हा सिनेमा आला. आता तिच्या आगामी प्रोजेक्ट्सची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
8 / 9
रितीका श्रोत्रीने हिंदीतही काम केलं आहे. सान्या मल्होत्राच्या 'मीनाक्षी सुंदरेश्वर' या सिनेमात तिने मुकाई ही भूमिका साकारली होती. 2021 साली सिनेमा रिलीज झाला होता.
9 / 9
वेस्टर्नच नाही तर पारंपरिक साडीतही तिचं सौंदर्य आणखी खुलून येतं. मराठमोळ्या रितीकाचा साडीतील लूक तरुणांच्या हदयाचे ठोके वाढवतो.
टॅग्स :मराठी अभिनेताव्हायरल फोटोज्सोशल मीडियामराठी चित्रपटसेलिब्रिटी