'युवराज'ची रिअल लाइफ पार्टनरही आहे अभिनेत्री; 'लग्नाची वाईफ वेडिंगची बायको'मालिकेत केलंय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 14:29 IST
1 / 11छोट्या पडद्यावर अलिकडेच सुरु झालेली मालिका म्हणजे पिंकीचा विजय असो. ही मालिका सुरु झाल्यापासून चर्चेत आहे.2 / 11या मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे हिने पिंकीची भूमिका साकारली आहे. तर अभिनेता विजय आंदळकर युवराज या भूमिकेत दिसून येत आहे.3 / 11या मालिकेत विजयने साकारलेल्या युवराज या भूमिकेला विशेष पसंती मिळत आहे. त्याचा रावडीपणा आणि बिंधास्तपणा प्रेक्षकांना खासकरुन आवडत आहे.4 / 11त्यामुळेच विजयच्या प्रोफेशनल लाइफसोबतच त्याच्या पर्सनल लाइफविषयी जाणून घेऊयात.5 / 11अनेकदा सोशल मीडियावर विजयच्या पत्नीची चर्चा होते. त्याची पत्नी काय करते, कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडतात.6 / 11विजयच्या पत्नीचं नाव रुपाली झनकर असं असून तीदेखील मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.7 / 11लग्नाची वाईफ वेडिंगची बायको या मालिकेत रुपाली झळकली होती.8 / 11मालिकेचं चित्रीकरण सुरु असतानाच विजय आणि रुपाली एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केलं.9 / 11रुपाली मुळची नाशिकची आहे. 10 / 11रुपालीपूर्वी विजयने अभिनेत्री पूजा पुरंदरे हिच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. पूजा पुरंदरे अलिकडेच सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत कामिनी ही भूमिका साकारताना दिसली होती.11 / 11विजय वर्तुळ, स्वराज्यरक्षक संभाजी, बाजीराव मस्तानी, 702 दीक्षित, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, गोठ, प्रेमा तुझा रंग कसा या चित्रपटांमध्ये झळकला आहे.