मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शकाची लेक गाजवतेय बॉलिवूड, आईदेखील आहे लोकप्रिय अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 15:00 IST
1 / 8एका बॉलिवूड अभिनेत्रीचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो बघून अभिनेत्रीला ओळखणं कठीण जात आहे. 2 / 8या अभिनेत्री अनेक बॉलिवूड सिनेमांसह काही साऊथ सिनेमांमध्येही काम केलं आहे. 3 / 8मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शकाची ही लेक आज बॉलिवूड गाजवत आहे. या अभिनेत्रीची आईदेखील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 4 / 8ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सई मांजरेकर आहे. सई ही दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि अभिनेत्री मेधा मांजरेकर यांची मुलगी आहे.5 / 8या फोटोंमध्ये सईला लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्याचं दिसत आहे. 6 / 8सईने २०१९ मध्ये 'दबंग ३' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात ती सलमान खानसोबत झळकली होती. 7 / 8पहिल्याच सिनेमाने तिला लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर ती 'अंतिम', 'औरो मे कहा दम था' या सिनेमांमध्ये दिसली. 8 / 8'मेजर', 'अर्जुन सन ऑफ वैजयंती', 'घनी' या साऊथ सिनेमांमध्येही सई महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली.