Join us
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीचा नादखुळा! स्वानंदी गोव्यात व्हॅकेशन करतेय एन्जॉय, बोल्ड फोटो केले शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 13:00 IST

1 / 10
स्वानंदी बेर्डे हे नाव मराठी प्रेक्षकांसाठी नवीन नाही. दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेकी स्वानंदी आज सगळ्यांच्या परिचयाची आहे.
2 / 10
सोशल मीडियावर स्वानंदीचा मोठा चाहतावर्ग आहे. विविध पोस्ट करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते.
3 / 10
अलिकडेच स्वानंदीने एक फोटोशूट केलं आहे. गोव्याच्या समुद्रकिनारी तिने केलेलं फोटोशूट चर्चेत आलं आहे.
4 / 10
स्वानंदी सध्या गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. गोव्याच्या समुद्रकिनारी स्वानंदीने स्विमिंग सूट परिधान करून बोल्ड फोटोशूट केले आहे.
5 / 10
या फोटोसोबत तिनं कॅप्शनमध्ये लिहलं, 'लाटांजवळ शांत बसले आणि समुद्राने मला आठवण करून दिली की सगळंच नियंत्रणात ठेवण्याची गरज नसते… काही गोष्टी फक्त अनुभवण्यासाठी असतात... हा सूर्यास्त, ही गार वाऱ्याची झुळूक आणि ही शांत, सुंदर आनंदाची भावना'.
6 / 10
स्वानंदी या फोटोमध्ये कमालीची सुंदर दिसत असून अनेक सेलिब्रिटींनीही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
7 / 10
स्वानंदीने नाटकातून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे. पहिल्याच नाटकात स्वानंदी तिची आई प्रिया बर्डेसोबत काम केले होते.
8 / 10
धनंजय माने इथेच राहतात का? या नाटकातून तिने कलाविश्वात पदार्पण केलं. स्वानंदीचे 'रिस्पेक्ट' आणि 'मन येड्यागत झालंया' हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.
9 / 10
केवळ अभिनयच नव्हे, तर स्वानंदीने उद्योजिका म्हणूनही आपली ओळख निर्माण केली आहे.
10 / 10
स्वानंदीचा स्वत:चा ज्वेलरी ब्रँड आहे. 'कांतप्रिया' असं तिच्या ज्वेलरी ब्रँडचं नाव आहे. वडील लक्षमीकांत(कांत) आणि आई प्रिया यांच्या नावावरून स्वानंदीने तिच्या ज्वेलरी ब्रँडचं नाव ठेवलं आहे.
टॅग्स :स्वानंदी बेर्डेलक्ष्मीकांत बेर्डेगोवा