'सिंघम'मधील या अभिनेत्याच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीला पाहिलंत का?, ती आहे मराठी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 11:37 IST
1 / 13२०११ साली सिंघम सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कलेक्शन केले होते. आजही हा चित्रपट प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहताना दिसतात. या चित्रपटात शिवाच्या भूमिकेतून अभिनेता अशोक समर्थला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.2 / 13अशोक समर्थने हिंदीतच नाही तर मराठी सिनेमा आणि मालिकेत काम केले आहे. फार कमी लोकांना माहित आहे की, त्याची पत्नीदेखील मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.3 / 13अशोक समर्थच्या पत्नीचं नाव शीतल पाठक असून त्यांनी २१ फेब्रुवारीस २०१९ रोजी लग्नगाठ बांधली आहे.4 / 13२०१३ साली ट्रॅफिक जॅम हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अशोक समर्थ आणि शीतल पाठक मुख्य भूमिकेत झळकले होते. इथूनच त्या दोघांची ओळख झाली होती.5 / 13शीतल पाठकने मिलिंद गवळींसोबत कृपासिंधू या चित्रपटात काम केले आहे. या सिनेमात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. याशिवाय तिने चेहरा, मंडळी तुमच्यासाठी कायपण, गाव माझं तंटामुक्त, बाय गो बाय, तात्या विंचू लगे रहो, सामर्थ्य या सिनेमात काम केले आहे.6 / 13याशिवाय तिने जो भी होगा देखा जायेगा या व्यावसायिक नाटकातही काम केले आहे. 7 / 13अशोक समर्थच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेतून छोट्या पडद्यावर त्याने पदार्पण केले. 8 / 13अशोक समर्थने लक्ष्य या लोकप्रिय मालिकेतून एसीपी अभय कीर्तिकर ही दमदार भूमिका साकारली. या भूमिकेला खूप लोकप्रियता मिळाली. जवळपास ५ वर्ष या मालिकेत काम केल्यानंतर हिंदी सिनेइंडस्ट्रीकडे वळला.9 / 13इन्सान या सिनेमातून अशोक समर्थने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. रोहित शेट्टीच्या सिंघम सिनेमात काम केले. 10 / 13रावडी राठोड, सिंबा, गली गली चोर है, सत्या २, आर राजकुमार, शेरसिंग या चित्रपटात तो झळकला.11 / 13याशिवाय त्याने बार्डो, बेधडक, दंडीत, बकाल, विट्टी दांडू या मराठी चित्रपटात काम केले.12 / 13अशोक समर्थ आणि शीतल पाठक सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात.13 / 13नुकतेच अशोक समर्थ आणि शीतल पाठक यांनी लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा केला.