Join us

‘YZ’ गाण्यांचा संगीत प्रकाशन सोहळा संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 14:02 IST

‘YZ’ हो फक्त नाव नाही तर ही एक कला आहे, राडा आहे, असं सांगणा-या ‘YZ’ चित्रपटाविषयी कधी कोणती बातमी ...

‘YZ’ हो फक्त नाव नाही तर ही एक कला आहे, राडा आहे, असं सांगणा-या ‘YZ’ चित्रपटाविषयी कधी कोणती बातमी वाचायला मिळतेय असं प्रेक्षकांना वाटत आहे.

या चित्रपटातील कथा, कलाकार यांमुळे सर्वजण उत्सुक आहेत. अतरंगी कलाकारांच्या नावाप्रमाणेच त्यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या गाण्यांची पण सर्व ठिकाणी हॅवॉक होत आहे.

 

समीर विद्वांस दिग्दर्शित आणि क्षितीज पटवर्धन लिखित ‘YZ’ या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकतंच संपन्न झाला.  संगीत प्रकाशनाच्यावेळी ‘YZ’ मधील सर्व कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, गायक जसराज जोशी, केतकी माटेगांवकर, स्वप्नील बांदोडकर, पूजा सावंत, गिरीजा गोडबोले आदी मान्यवर उपस्थित होते.

अरे कान्हा अरे क्रिष्णा हे पारंपारिक बोल असलेले सुंदर गाणं आणि जगात प्रेमाचे तीन प्रकार असतात हे सांगणारं ओ काका हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे आणि आता या गाण्यांचा सगळीकडे हॅवॉक तर होणारच.