पप्पी दे...पप्पी दे... पप्पी दे पारुला या गाण्यातून आज सगळीकडे सुपरहिट ठरलेली पारु उर्फ अभिनेत्री स्मिता गोंदकरला फायनली पप्पी मिळाली आहे. आता या पारुला कोणाची पप्पी मिळाली याच्या विचारात तर तुम्ही नक्कीच पडला असणार ना? पारुला काय अशी तशी पप्पी मिळालेली नाही तर तिला ही पप्पी मिळाली आहे थेट डॉल्फीन कडून. होय, एका क्युट डॉल्फीनने या सुंदर पारुला पप्पी देऊन अखेर तिची इच्छा पूर्ण केली आणि पारुला शेवटी पप्पी मिळालीच.
स्मिताला लहानपणापासूनच प्राणी अतिशय आवडतता. ती अॅनिलम लव्हर आहे. आता प्राणी म्हंटल्यावर आपल्या नजरेसमोर येतात ते मांजर, कुत्रा. पण या डॅशिंग हिरोईनला मात्र साप, मगर, घोडा, सरडे, डॉल्फीन, ससे, घार, असे कितीतरी प्राणी आणि पक्षी आवडतात असे समजलेय. तर एका सापाला स्मिताने हातात घेऊन त्याला कुरवाळत असतानाचा व्हीडिओ मध्यंतरीच व्हायरल झाला होता. काही दिवसांपूर्वी स्मिता अमेरिकेला गेली असता तिथे तिने थेट मगरी सोबतच फोटो काढले आहेत. सहसा मगरीला समोर पाहिल्यावर अंगावर काटा येतो. पण स्मिताने बिनधास्तपणे मगरीच्या पाठीवर बसून एकदम भन्नाट फोटो काढला आहे. तर तिचे डॉल्फीन सोबत देखील धमाल करतानाचे फोटो मिळाले आहेत.
स्मिता अॅनिमल लव्हर असल्याने ती सांगते, मला प्राणी फारच आवडतात. त्यांच्यासोबत वेळ घालवायला, फोटो काढायला देखील मला आवडते. मी जेव्हा अमेरिकेत गेले होते तेव्हा मला क्रोकोडायल सोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. परंतू अमेरिका हा असा देश आहे कि तिथे सगळ््या प्रकारची सुरक्षा घेतली जाते. मी देखील सुरक्षारक्षकांच्या ताफ्यातच मगरी सोबत एक मस्त फोटो क्लिक केला आहे. त्यामुळे मी सर्वाना सांगीत की जेव्ही तुम्ही जंगलात जाता तेव्हा प्राण्यांच्या जास्त जवळ जाऊ नका. त्यांना त्रास होईल असे काहीच करु नका. आता पारुने दिलेला हा सल्ला तिचे चाहते नक्कीच फॉलो करतील यात काही शंका नाही. पण स्मिताचा अॅनिमल सोबतचा हा डॅशिंग अंदाज पाहता, बच के रेहना रे बाबा... एवढेच म्हणावेसे वाटेल