जगभरातील ताºयांच्या झगमगाटात रेड कारपेटवर चालण्याची संधी मिळणे म्हणजे त्या कलाकारासाठी खरच स्वप्नपुर्ती झाल्यासारखेच असते. इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलच्या रेड कारपेटवरुन चालायचे म्हणजे जगभरातील लोकांचे आपल्याकडे लक्ष वेधणार. आता अशीच संधी मिळाली होती आपल्या ब्युटीफुल पुजा सावंतला. पुजाला नूकतेच माद्रिद फिल्म फेस्टीवल कडुन तिच्या लपाछपी या चित्रपटासाठी निमंत्रीत करण्यात आले होते.
ही बातमीच पुजासाठी खुप आनंदाची होती. आपला चित्रपट आज जागतिक स्तरापर्यंत पोहचला असल्याने तिचा आनंद द्वीगुणीत झाला होता. या अॅवॉर्ड फंक्शनच्या रेड कारपेटवरील काही फोटोज पुजाने सर्वप्रथम सीएनएक्स सोबतच शेअर केले अन तीच्या या एक्सपीरिअन्स बद्दल सीएनएक्सला खास मुलाखत देखील दिली.
पुजा म्हणाली लपाछपी या चित्रपटासाठी जेव्हा माझे नॉमिनेशन जगभरातील अॅक्ट्रेस सोबत झाले तेव्हा खुपच मस्त वाटले. माझी व्हीडीओ क्लिप सर्व इंटरनॅशनल स्टर्स बरोबर जेव्हा दाखविण्यात आली तो क्षणच माझ्यासाठी अविस्मरणीय होता. ब्लॅक कलरचा एम्ब्रॉयडरी टॉप अन गोल्डन कलरचे नक्षीकाम असलेला आॅफ व्हाईट लेहेंगा असा इंडो-वेस्टर्न कॉश्च्युम पुजाने या रेड कारपेटसाठी परिधान केला होता. या ड्रेसची स्टाईल श्रद्धा ओझा अन गाऊन प्रीती डिझाईन हट यांचे आहेत. या संपुर्ण लुकमध्येच पुजा अतिशय सुंदर दिसत होती अन रेड कारपेटवर मराठमोळा जलवा देखील दाखवित होती.