Join us
Daily Top 2Weekly Top 5

याची बातच न्यारी!! हा मराठमोळा हिरो फिटनेसच्या बाबतीत बॉलिवूडच्या अभिनेत्यांनाही देतो टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 13:14 IST

1 / 8
बॉलिवूड कलाकारांचं फिटनेस प्रेम तुम्हाला ठाऊक आहेच. पण आता मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारही याला अपवाद नाहीत. होय, अभिनेता चिन्मय उदगीरकर असाच एक मराठी चित्रपटसृष्टीतील फिट नट.
2 / 8
चिन्मयने नुकताच सोशल मिडियावर त्याचा फोटो शेअर केला. अ‍ॅब्ज फ्लाँटींग करणारा त्याचा हा फोटो पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. त्याचा हा अंदाज चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.
3 / 8
चिन्मय न चुकता व्यायाम करतो. शूटींगमधून वेळ काढून व्यायाम करणं खरं तर तारेवरची कसरत. पण कलाकारांना स्वत:ला फिट ठेवण्यासाठी हे करावंच लागंत. पण शरीरासोबत मन सुद्धा फिट ठेवण्याकडं त्याचा कल आहे.
4 / 8
रोजच्या नियमित व्यायामासोबत तो न चुकता ध्यानसाधनाही करतो. फिजिकल फिटनेससोबतच मेन्टल फिटनेस महत्त्वाचा आहे, असं तो मानतो.
5 / 8
स्टार प्रवाहवरील ‘स्वप्नांच्या पलीकडे’ या मालिकेतीून चिन्मय पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आला.
6 / 8
पण त्याला खरी लोकप्रियता दिली ती नांदा सौख्य भरे आणि घाडगे अ‍ॅण्ड सून या मालिकेने. श्यामचे वडील, प्रेमवारी, मेकअप, वाजवुया बँडबाजा या मराठी सिनेमात तो झळकला आहे.
7 / 8
चिन्मय अलीकडे गणपती स्पेशल ‘देवा गणराया’ गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात त्याच्यासोबत अभिनेत्री रुपाली भोसले देखील आहे.
8 / 8
चिन्मय बिग मराठीच्या तिसºया सीझनमध्ये दिसणार, अशी चर्चा सध्या सुरू आहे. तशी बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनपासूनच चिन्मयच्या नावाची चर्चा आहे. आता तो खरंच बिग बॉस मराठीच्या घरात जाणार का, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.
टॅग्स :चिन्मय उद्गगिरकर