अमृता खानविलकर : प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने ख्रिसमसच्या सणाचा आनंद लुटला असल्याचे पाहायला मिळत आहे. तिने मलेशिया येथे ख्रिसमस ट्रीसोबत फोटो काढला आहे. तसेच या फोटोमध्ये तिच्यासोबत तिची आईदेखील दिसत आहे.
सुशांत शेलार: आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनं जिंकणारा अभिनेता सुशांत शेलारदेखील ख्रिसमसचा आनंद मलेशियामध्ये लुटत आहे. यानेदेखील ख्रिसमस ट्रीसोबतचा एक फोटो सोशलमीडियावर अपलोड केला आहे. त्याच्या या फोटोला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
सोनाली कुलकर्णी : मराठी चित्रपटसृष्ट्रीच्या या अभिनेत्रीने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनावर राज्य केले आहे. या अभिनेत्रींनेदेखील सांताक्लॉजची टोपी घालून झक्कास क्लिक कैद केला आहे. तसेच तिने आपल्या चाहत्यांनादेखील सोशलमीडियावर ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहे.
दिपाली सैय्यद: या अभिनेत्रीने नेहमीच आपल्या नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटविला आहे. या अभिनेत्रीनेदेखील ख्रिसमस सेलिब्रिशनचा झक्कास फोटो सोशलमीडियावर अपलोड केला आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांनी भरभरून पसंती दिली असल्याचे पाहायला मिळत आहे.
सिध्दार्थ जाधव: या अभिनेत्याने गेला उडत स्टाइलने ख्रिसमस उत्सावाचा आनंद लुटला आहे. सिध्दार्थने ख्रिसमस ट्रीसोबत गेला उडत या स्टाइलने फोटो काढला आहे.