Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंकुश चौधरीची पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, तिने शेअर केलेली पोस्ट आली चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 16:22 IST

1 / 9
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी याचा वाढदिवस आहे. तसेच आज त्याच्या लग्नाचाही वाढदिवस आहे.
2 / 9
फार कमी लोकांना माहित आहे की, त्याची पत्नीदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ही अभिनेत्री म्हणजे दीपा चौधरी.
3 / 9
दीपा चौधरी सध्या झी मराठी वाहिनीवरील तू चाल पुढं या मालिकेत काम करते आहे. या मालिकेत तिने साकारलेली अश्विनीची भूमिका प्रेक्षकांना खूप भावते आहे.
4 / 9
दरम्यान दीपाने पती अंकुशच्या वाढदिवस आणि लग्नाच्या वाढदिवसानिमित्त स्पेशल पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
5 / 9
दीपाने इंस्टाग्रामवर अंकुशसोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, वाढदिवसाच्या आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
6 / 9
या पोस्टमध्ये तिने पुढे म्हटले की, प्रत्येक वर्ष जात असताना, मी तुझ्या आणखी प्रेमात पडतेय. माझ्या बाबतीत घडलेली सर्वोत्तम गोष्ट तू आहेस. जीवनाच्या प्रत्येक पैलूत आपल्या पत्नीला साथ देणारा पती असल्याबद्दल धन्यवाद! माझे तुझ्यावर प्रेम आहे.
7 / 9
अंकुश आणि दिपाने २००७ साली लग्न केले आणि त्यांना प्रिन्स नावाचा मुलगा देखील आहे.
8 / 9
अंकुश आणि दिपा यांची लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. त्यांनी तब्बल दहा वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले.
9 / 9
अंकुश आणि दीपा बऱ्याचदा सोशल मीडियावर फॅमिलीचा फोटो शेअर करत असतात.
टॅग्स :अंकुश चौधरी