प्रिया बापट वयाच्या ३९ व्या वर्षीही दिसते सुंदर, सौंदर्य अन् फिटनेसचं रहस्य सांगत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 12:00 IST
1 / 8मराठी तसंच आता हिंदीतही सक्रीय असलेली सर्वांची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट. वयाच्या ३९ व्या वर्षीही ती अगदी विशीतलीच असल्यासारखी सुंदर दिसते.2 / 8प्रियाने बालपणापासूनच अभिनयाला सुरुवात केली होती. २००१ साली 'दे धमाल' ही लहान मुलांची मालिका यायची ज्यात प्रियाही होती.3 / 8प्रियाला सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. त्यावर ती अनेकदा तिच्या वर्कआऊटचे व्हिडीओही शेअर करते. तसंच घरात ती अगदी टिपीकल मराठमोळी असते तसाच आहारही घेते. शिवाय उत्तम स्वयंपाकही करते. 4 / 8प्रियाच्या या सौंदर्याचं रहस्य नक्की काय आहे? न्यूज १८ लोकमतला दिलेल्या मुलाखतीत प्रिया म्हणाली, 'मी नियमित व्यायाम करते. भरपूर पाणी पिते. पोषक आहार घेते.'5 / 8मला गोड खूप वाटतं. पण तेही मी प्रमाणातच खाते. मी अजिबातच खादाड नाही. वडापाव, फ्रँकी, बर्गर, पिझ्झा खाल्लं असं फारसं होत नाही. मुळात मला ते आवडतही नाही.'6 / 8'वरण भात, उसळ, कोशिंबीर, भाकरी हे आहारात असेल तर मी जास्त सुखी असते. याच्यापलीकडे कधीतरी काही खाल्लं तर ठिके पण सारखं बाहेरचं खाऊन मला जगता येत नाही.:7 / 8'मी फळं भरपूर खाते आणि मला ते खरंच आवडतात. या सगळ्यासाठी मला कोणीही जबरदस्ती करत नाही किंवा हे असंच केलं पाहिजे म्हणून मी हे करत नाही. तर हे मला खरंच आवडतं. खूप वर्षात हेच माझ्या जीवनशैलीचा भाग झालं आहे. रात्री मी वेळेत साडेसातच्या आत जेवते.'8 / 8प्रिया आणि उमेश कामत ही प्रेक्षकांची रील आणि रिअल लाईफमध्ये लाडकी जोडी आहे. दोघंही आदर्श कपल आहेत. प्रिया आगामी 'असंभव' मराठी सिनेमात दिसणार आहे. शिवाय प्रिया-उमेशचं 'जर तरची गोष्ट' नाटक जोरात सुरु आहे.