Join us
Daily Top 2Weekly Top 5

2016 मध्ये रिंकू राजगुरू आणि या अभिनेत्रींनी गाजवली मराठी इंडस्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2016 15:26 IST

मराठी इंडस्ट्रीत कोणकोणत्या अभिनेत्री ठरल्या 2016मध्ये सरस... त्यावर टाकूया एक नजर...रिंकू राजगुरूसैराट हा रिंकूचा पहिलाच चित्रपट असला ...

मराठी इंडस्ट्रीत कोणकोणत्या अभिनेत्री ठरल्या 2016मध्ये सरस... त्यावर टाकूया एक नजर...

रिंकू राजगुरू
सैराट हा रिंकूचा पहिलाच चित्रपट असला तरी तिच्या अभिनयातून ते कुठेच जाणवले नाही. रिंकू या चित्रपटामुळे तरुणाईची प्रचंड लाडकी बनली आहे. तिची एक झलक पाहाण्यासाठी तिचे फॅन्स प्रचंड गर्दी करतात.

 

वीणा जामकर 
लालबागची राणी या चित्रपटात वीणा जामकरने एका गतिमंद मुलीची भूमिका साकारली होती. वीणाने या भूमिकेला योग्य न्याय दिला. तिच्या कामाचे कौतुक प्रेक्षकांसोबतच समीक्षकांनीदेखील केले.







प्रिया बापट
वजनदार या चित्रपटासाठी प्रियाने कित्येक किलो वजन वाढवले होते. त्यामुळे या चित्रपटातील तिच्या भूमिकेची चर्चा चित्रपट प्रदर्शित व्हायच्याआधी कित्येक दिवसांपासून होती. या भूमिकेसाठी प्रियाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली.



सई ताम्हणकर
सई नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारते. सगळ्याच चित्रपटात प्रेक्षकांना एक वेगळी सई पाहायला मिळते. वजनदार या चित्रपटातही सईने अप्रतिम अभिनय केला आहे.




मेधा मांजरेकर
नटसम्राट या चित्रपटात मेधा नाना पाटेकरांच्या पत्नीच्या भूमिकेत झळकली होती. मेधाने या चित्रपटात साकारलेली भूमिका ही तिच्या खऱ्या वयापेक्षा खूपच मोठी होती. पण तरीही मेधाने या भूमिकेला योग्य न्याय दिला.