सोनाली कुलकर्णीचे फोटो पाहून उर्मिला मातोंडकरला राहवेना, कमेंट करत म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 17:05 IST
1 / 7निखळ सौंदर्य आणि दमदार अभिनयाच्या जोरावर सोनाली आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करते आहे. 2 / 7मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये देखील तिने आपल्या अभिनयाने दबदबा निर्माण केला आहे. 3 / 7नुकतेच सोनालीने सोशल मीडियावर तिचे काही निवडक फोटो पोस्ट केल्याचं पाहायला मिळतंय.4 / 7या फोटोंमध्ये अभिनेत्री फारच सुंदर दिसते. फिकट गुलबी रंगाची साडी, केसांची वेणी बांधून त्यामध्ये तिने गुलाबाचं फुल माळलं आहे. 5 / 7सोनालीचे फोटो पाहून उर्मिला मातोंडकरनेही त्यावर कमेंट केली आहे. 'So Pretty' असं म्हणत अभिनेत्रीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. 6 / 7अभिनयासोबतच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या बिनधास्त आणि बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते. 7 / 7'अगं बाई अरेच्या २', 'डॉ. प्रकाश बाबा आमटे', 'सिंघम', 'वेल डन अब्बा', 'दिल चाहता हैं, 'प्यार तुने क्या किया', 'गुलाबजाम' अशा कितीतरी हिंदी, मराठी सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.