पहिल्या वर्षी लवासा आणि दुसऱ्या वर्षी पंचगणीला ही क्रिकेट लीग संपन्न झाल्यानंतर यंदा एम.बी.सी.एल. चा तिसरा सिझन कोल्हापूरात आयोजित करण्यात आला आहे. यंदाचे सामने दहा संघात खेळले जाणार असून ४ ते ६ मे दरम्यान कोल्हापुरातील भव्य असा शाहू मैदानावर प्रथमच प्रेक्षकांच्या उपस्थित रंगणार आहे.
डॅशिंग मुंबई, ठाणे शिलेदार, रत्नागिरी टायगर्स, क्लासिक नासिक, फटाका औरंगाबाद, शूर कोल्हापूर, अजिंक्यतारा सातारा, मस्त पूणे, कोहीनूर नागपूर अशा नऊ टीम गेल्या वर्षी मराठी बॉक्स क्रिकेट लीगमध्ये होत्या. यंदा दहाव्या टीमचा ह्या लीगमध्ये समावेश झाला आहे. नवी मुंबईचा धडाकेबाज नवी मुंबई हा नवा संघ सहभागी झाला आहे.
मराठी सेलिब्रिटी बॉक्स क्रिकेट लीग २०१६ च्या शानदार पार्टीत सर्वच कलाकारांनी एकच जल्लोष केला. यावेळी प्रथमच देण्यात येणाऱ्या रोख बक्षीसांची घोषणा करण्यात आली. विजेत्या संघाला अडीच लाखाचे बक्षीस तर उपविजेत्या संघाला सव्वा लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले.