Join us  

सई ताम्हणकरचा बोल्ड लूक चर्चेत; शेअर केले ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 3:12 PM

1 / 7
मराठी कलाविश्वातील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर.
2 / 7
उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर सईने मराठी प्रेक्षकांच्या मनावर भूरळ पाडली आहे.
3 / 7
मराठीसह बॉलिवूडमध्येही सईने आपली छाप सोडली आहे. त्यामुळे आज सई कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
4 / 7
आजवर सईने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. यामध्येच सध्या ती श्रीदेवी प्रसन्न, भक्षक या सिनेमांमुळे चर्चेत येत आहे.
5 / 7
सई सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम नवनवीन पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत असते.
6 / 7
अलिकडेच सईने एक फोटोशूट केलं आहे. त्यातील काही निवडक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
7 / 7
सईने काळ्या रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये फोटोशूट केलं. या फोटोमध्ये ती कमालीची ग्लॅमरस दिसत आहे.
टॅग्स :सई ताम्हणकरबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा