Join us  

झाडाखाली निवांत झोपलेली 'ही' मराठी अभिनेत्री कोण? स्वत:च्या फार्महाऊसमध्ये घालवतेय वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 9:53 AM

1 / 9
मराठी कलाविश्वात सध्या अभिनेत्रींची चलती आहे. अनेक अभिनेत्री स्वकष्टाने हक्काचं घर घेत आहेत. सई ताम्हणकर, धनश्री काडगांवकर, ऋतुजा बागवेसह काही अभिनेत्रींनी नुकतंच घर घेतलं. तर सर्वांची लाडकी प्राजू म्हणजेच प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) थेट कर्जतमध्ये निसर्गरम्य वातावरणात हक्काचं फार्महाऊसच खरेदी केलं.
2 / 9
नुकतंच प्राजक्ताने फार्महाऊसमध्ये वेळ घालवतानाचे काही फोटो शेअर केलेत. यामध्ये ती वडाच्या झाडाखाली सोफ्यावर निवांत झोपली आहे. तर समोर टेबलवर खाण्याचे पदार्थ ठेवलेत.
3 / 9
तर दुसऱ्या फोटोत ती कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेताना दिसत आहे. झोपाळ्यावर निवांत बसून ती चहाचा आस्वाद घेताना दिसत आहे. याचसाठी केला होता अट्टहास म्हणत ती आपल्याच फार्महाऊसमध्ये फुल मजा करताना दिसत आहे.
4 / 9
प्राजक्ताचा 'तीन अडकून सीताराम' हा मराठी सिनेमा नुकताच रिलीज झालाय. यामध्ये तिच्यासोबत वैभव तत्ववादी, आलोक राजवाडे आणि संकर्षण कऱ्हाडे हे तीन हिरो आहेत. प्रत्येक चित्रपटाच्या रिलीजनंतर किंवा ठराविक काम संपल्यानंतर प्राजक्ताने 'प्राजक्तकुंज'मध्ये येऊन वेळ घालवणार असल्याचं ठरवलंय.
5 / 9
ती म्हणते, याचसाठी केला होता अट्टहास...प्रत्येक सिनेमाच्या चित्रीकरणानंतर आणि रिलीजनंतर, कुंज येथे येऊन आराम करणं ही एक परंपराच असणार आहे. #mandatory कारण निसर्ग तुम्हाला प्रफुल्लित करतो. शांतता आणि समाधान देतो.
6 / 9
धकाधकीच्या आयुष्यात अशा नेचर ब्रेकची गरज असतेच. प्राजक्ताचे हे फोटो पाहून चाहतेही खूश झालेत. 'आम्हालाही घेऊन चल' अशी मागणी चाहत्यांनी केलीये.
7 / 9
प्राजक्ता कुटुंबासोबतही अनेकदा फार्महाऊसवर येऊन वेळ घालवते. तिच्या दोन भाच्या आहेत ज्यांच्यासोबत ती मस्ती करताना दिसते.काहीच दिवसांपूर्वी प्राजक्ता फार्महाऊसजवळच असलेल्या वाहत्या झऱ्यात निवांत बसलेली दिसली.
8 / 9
तीन महिन्यांपूर्वीच प्राजक्ताने फार्म हाऊस खरेदी केल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. डोंगराच्या कुशीत घर पाहिजे एवढंच तिचं स्वप्न होतं ते पूर्ण झालं. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी तिला यासाठी शुभेच्छा दिल्या.
9 / 9
सध्या प्राजक्ता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे. शिवाय तिचा सिनेमाही रिलीज झालाय. तसंच प्राजक्तसाज या तिच्या ज्वेलरी ब्रँडलाही चांगलं यश मिळालं आहे.
टॅग्स :प्राजक्ता माळीमहाराष्ट्राची हास्य जत्रामराठी अभिनेताकर्जत