Join us

ये मेरा दिल प्यार का दिवाना! मराठमोळ्या अभिनेत्रीचा हॉट लूक, शेअर केले Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 14:19 IST

1 / 8
मराठी मालिकांमध्ये मुख्य अभिनेत्री तर लोकप्रिय होतातच पण खलनायिकांनाही तेवढंच प्रेम मिळतं. अशीच एक ग्लॅमरस खलनायिका सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे.
2 / 8
ही अभिनेत्री आहे निशानी बोरुले (Nishani Borule). स्टार प्रवाह वरील 'मुरांबा' मालिकेतून निशानी घराघरात पोहोचली. मालिकेत तिने रेवा राजाध्यक्ष ही खलनायिका साकारली आहे.
3 / 8
निशानी जशी मालिकेत ग्लॅमरस दिसली आहे तशीच ती खऱ्या आयुष्यातही आहे. इन्स्टाग्रामवर तिची लोकप्रियता वाढत चालली आहे. तिचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.
4 / 8
नुकतंच तिने हे ग्लॅमरस फोटोशूट पोस्ट केलं आहे. गोल्डन शिमरी गाऊनमध्ये ती कमाल दिसत आहे. तिला पाहून डॉन मधील 'ये मेरा दिल प्यार का दिवाना' या करीना कपूरच्या गाण्याचीच आठवण होईल.
5 / 8
कर्वी फिगर, डीप नेक गाऊन न्यूड मेकअप आणि सुंदर हेअरस्टाईल असा तिचा हॉट लूक आहे. निशानीच्या सौंदर्याने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय.
6 / 8
या लूकमध्ये तिने एकापेक्षा एक किलर पोज दिल्या आहेत. 'हॉट', 'सिंपली गॉर्जियस' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
7 / 8
मालिकेत रेवाचा खलनायकी अवतार पाहिल्यानंतर प्रत्यक्षात तिला इतकं ग्लॅमरस पाहून चाहते प्रेमात पडले आहेत.
8 / 8
निशाणी सोशल मीडियावर सक्रिय असून अनेकदा तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिचे हजारो फॉलोअर्स आहेत. 'मुरांबा' ही तिची पहिलीच मालिका आहे.
टॅग्स :मराठी अभिनेताव्हायरल फोटोज्सोशल मीडिया