Join us  

'तुझ्या डिझायनरला विचार..'; अभिज्ञाच्या स्टायलिश लूकवर मेहुल पैची भन्नाट कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 12:25 PM

1 / 8
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे. उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर अभिज्ञाने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
2 / 8
अभिज्ञाने मराठीसह हिंदी मालिका विश्वातही एन्ट्री केली आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्ग आता बराच वाढला आहे.
3 / 8
अभिज्ञा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम नवनवीन पोस्ट चाहत्यांसोबत शेअर करत असते.
4 / 8
अलिकडेच तिने एक फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये तिचा लेडी बॉस लूक दिसून येत आहे.
5 / 8
अभिज्ञाचे हे फोटो पाहून सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्याच्यावर कमेंटचा पाऊस पाडला आहे. मात्र, या सगळ्यात अभिज्ञाच्या नवऱ्याची कमेंट चर्चेत आली आहे.
6 / 8
मेहुलने अभिज्ञाच्या फोटोवर भन्नाट कमेंट केली आहे. त्याची ही कमेंट पाहून नेटकऱ्यांनाही हसू अनावर झालं आहे.
7 / 8
'तुझ्या डिझायनरला विचार ना की मलाही स्टाइल करायला मदत करशील का?' अशी कमेंट मेहुलने केली आहे.
8 / 8
एकंदरीत मेहुलला अभिज्ञाचा हा लूक आवडल्याचं त्याच्या या कमेंटवरुन लक्षात येतं.
टॅग्स :अभिज्ञा भावेटेलिव्हिजनटिव्ही कलाकार