Join us  

वडिलांच्या पावलावर पाऊल! विजय चव्हाणांचा लेकही आहे प्रसिद्ध अभिनेता; 'या' मालिकेत करतोय काम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2022 1:57 PM

1 / 10
विजय चव्हाण यांनी त्यांच्या अभिनयाने गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. त्यामुळे आज ते आपल्यात नसले तरीदेखील त्यांच्या अभिनयातून त्यांच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत.
2 / 10
मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचे मोठे झालेल्या विजय चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली.
3 / 10
चित्रपट, नाटकातील त्यांच्या अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. मोरूची मावशी या नाटकात त्यांनी रंगवलेले स्त्री पात्र प्रेक्षक कधीचं विसरू शकत नाहीत.
4 / 10
विजय चव्हाण यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या लेकानेही मराठी कलाविश्वात पदार्पण केलं आहे.
5 / 10
विजय चव्हाण यांच्या लेकाने आजवर अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.
6 / 10
वरद चव्हाण असं विजय चव्हाण यांच्या लेकाचं नाव आहे.
7 / 10
वरदने ऑन ड्युटी 24 तास, धनगरवाडा यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. तसेच 100 डेज या मालिकेत तो झळकला होता.
8 / 10
सध्या वरद आई मायेचं कवच या मालिकेत काम करत आहे.
9 / 10
वरद आणि विजय चव्हाण या दोन्ही पिता-पुत्राचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे ८ फेब्रुवारीला असतो. त्यामुळे प्रत्येक वाढदिवशी वरद त्याच्या वडिलांच्या आठवणीत भावुक होतो.
10 / 10
वरद सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तो विजय चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा देत असतो.
टॅग्स :विजय चव्हाणसेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजन