Join us

Mandakini : 'राम तेरी गंगा मैली'मधल्या बोल्ड सीनवर अभिनेत्री मंदाकिनीनं तब्बल ३७ वर्षांनंतर सोडलं मौन, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 14:00 IST

1 / 8
नव्वदच्या दशकातील अभिनेत्री मंदाकिनी तिच्या पहिल्या चित्रपट राम तेरी गंगा मैलीमधील तिच्या बोल्ड आणि कामुक दृश्यांसाठी ओळखली जाते. हा चित्रपट १९८५ मध्ये रिलीज झाला आणि त्यानंतर मंदाकिनीचे करिअर यशाच्या शिखरावर होते.
2 / 8
राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील दोन दृश्यांमुळे मंदाकिनी सर्वाधिक चर्चेत आली. एक सीन होता ज्यात ती पांढरी साडी नेसून धबधब्याखाली आंघोळ करताना दाखवली होती.
3 / 8
दुसऱ्या सीनमध्ये ती मुलाला स्तनपान करताना दाखवण्यात आली होती. या दोन्ही सीनमध्ये मंदाकिनीला तिच्या बॉडी पार्टमुळे खूप टीकेला सामोरे जावे लागले होते.
4 / 8
या टीकेवर मंदाकिनीने २०२२ मध्ये ३७ वर्षांनंतर मौन सोडले आणि म्हणाली, सर्वात आधी मी तुम्हाला सांगते की, हा ब्रेस्ट फीडिंग सीन नव्हता, तो अशा पद्धतीने दाखवण्यात आला होता की, मी स्तनपान करत आहे. तो कसा शूट झाला हे मी सांगायला सुरुवात केली तर लांबलचक चर्चा होईल.
5 / 8
ती पुढे म्हणाली की, सीनमध्ये तुम्ही पाहिलेला क्लीवेज जास्त वाटत होता पण ते तंत्रज्ञानाच्या मदतीने शूट करण्यात आले होते. आजकालच्या स्किन शोच्या तुलनेत ते काहीच नव्हते. त्या दिवसांत आम्ही याबद्दल बोललोही नाही. हे सर्व दृश्य शुद्ध होते, आजकाल सर्व काही सेक्सुअलिटीसाठी आहे.
6 / 8
या चित्रपटानंतर मंदाकिनीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले, पण नंतर अचानक तिने फिल्म इंडस्ट्री सोडली.
7 / 8
१९९६ मध्ये आलेला 'जोरदार' हा तिचा शेवटचा चित्रपट होता. यानंतर मंदाकिनीने डॉ. रिनपोचे ठाकूर यांच्याशी लग्न केले आणि बॉलिवूडला अलविदा केले.
8 / 8
मंदाकिनीच्या कारकिर्दीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबतचा फोटो व्हायरल झाल्याने ती अधिक वादात सापडली.
टॅग्स :मंदाकिनी