By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 12:18 IST
1 / 9साऊथ इंडस्ट्रीतील अनेक स्टार्स खूप लोकप्रिय आहेत. पण यात एक असा सुपरस्टार आहे, ज्याचे जगभर चाहते आहेत. त्याचे नाव महेशबाबू. आज त्याचा वाढदिवस.2 / 99 ऑगस्ट 1975 रोजी चेन्नईत जन्मलेल्या महेशबाबूने बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली होती. यानंतर 1999 मध्ये ‘राजकुमारूदु’ या सिनेमातून त्याने मुख्य अभिनेता म्हणून डेब्यू केला.3 / 9महेश बाबूने बाल कलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं होतं. आपल्या अभिनयाच्या जादूने महेशने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.4 / 9आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या महेशबाबूकडे करोडो रुपयांची संपत्ती आहे. होय, महेशबाबू 134 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. 5 / 9caknowledge.com नुसार 2021 सालामध्ये त्याची नेट वर्थ 18 मिलियन डॉलर इतकी आहे. महिन्याला तो 1 कोटीपेक्षा जास्त कमावतो. वर्षाकाठी तो 12 कोटींपेक्षा अधिक कमाई करतो.6 / 9 हैदराबादेतील पॉश भागात महेशबाबचा अलिशान बंगला आहे. या बंगल्याची किंमतच 28 कोटींच्या आसपास आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने बेंगळूरूमध्ये देखील नवी प्रापर्टी खरेदी केलीय.7 / 9महेश बाबूला कारचा फार शौक असून त्याच्याकडे अनेक महागड्या कार्सचे कलेक्शन आहे. त्यामध्ये Lamborghini Gallardo (3 कोटी रुपये), Range Rover Vogue (1.6 कोटी रुपये), Toyota Land Cruiser (1.25 कोटी रुपये), Mercedes Benz E class (49 लाख रुपये), Audi A 8 (1.30 कोटी रुपये) यांसारख्या महागड्या गाड्या आहेत. 8 / 9महेश बाबूकडे सर्व सोयीसुविधा असलेली एक लक्झरी व्हॅनिटी व्हॅन आहे. या व्हॅनिटीची किंमत वाचून तुम्ही हैराण व्हाल. महेश बाबूच्या व्हॅनिटी व्हॅनची किंमत जवळपास ६.०२ कोटी रुपये इतकी आहे. त्याची ही व्हॅनिटी व्हॅन शाहरूख खानच्या व्हॅनिटी व्हॅनपेक्षा जास्त महागडी आहे.9 / 9महेश बाबूचे स्वत:च पण एक प्रोडक्शन हाऊस आहे. त्याने या बॅनर खाली अनेक सिनेमांची निर्मिती केली आहे.