Join us  

Vanita Kharat Wedding : वनिता खरात लवकरच होणार नवरी; पाहा, मेहंदी सोहळ्याचे खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 3:26 PM

1 / 8
सर्वांना खळखळून हसवणारी सर्वांची लाडकी वनी अर्थात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात हिच्या लग्नविधींना सुरूवात झाली आहे.
2 / 8
वनिता बॉयफ्रेंड सुमित लोढेंसह २ फ्रेब्रुवारीला विवाहबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.
3 / 8
वनिताने तिच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
4 / 8
सुमितने त्याच्या होणाऱ्या पत्नीसाठी हातावर मेहेंदी काढली. वनीचं नाव त्याने हातावर लिहिलं.
5 / 8
वनिता व सुमितने त्यांच्या लग्नासाठी खास हॅशटॅग तयार केला आहे. “#su’MEET’vani” असा खास हॅशटॅग या जोडप्याने प्रत्येक फोटोखाली दिला आहे.
6 / 8
वनीच्या मेहंदी सोहळ्याला शिवाली परब, चेतना भट्ट यांच्यासह ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कलाकार हजर होते.
7 / 8
काही दिवसांआधी वनिताने प्री वेडिंग फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. या फाेटोत दोघंही रोमॅन्टिक पोझ देताना दिसले होते.
8 / 8
वनिताचा होणारा नवरा सुमित लोंढे हा एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहे. तसेच तो व्हिडीओ क्रिएटर असण्यासोबत ब्लॉगरदेखील आहे.
टॅग्स :वनिता खरातमहाराष्ट्राची हास्य जत्रामराठी अभिनेता