Join us  

नवरा प्रसिद्ध कलाकार असूनही समीर चौगुलेची पत्नी राहते लाईमलाईटपासून कोसो दूर; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 7:00 AM

1 / 8
उत्तम अभिनय आणि आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा अभिनेता म्हणजे समीर चौगुले. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 8
विनोदवीर असण्यासोबतच समीर चौगुले एक गुणी लेखकदेखील आहे. त्यामुळे अनेकदा तो त्याचे स्किट स्वत:चं लिहित असतो. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 8
कलाविश्वाप्रमाणेच समीर सोशल मीडियावरही कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा तो त्याच्या अपकमिंग प्रोजेक्ट वा अन्य गोष्टींची माहिती नेटकऱ्यांना देत असतो. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 8
5 / 8
लग्नाच्या २५व्या वाढदिवसानिमित्त समीर पत्नीला कँडल लाइट डिनरला घेऊन गेला होता. त्यादरम्यानचाच फोटो शेअर करत त्याने पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 8
समीरच्या पत्नीचं नाव कविता चौगुले असं असून त्या कलाविश्वापासून दूर आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
7 / 8
कविता यांचा सोशल मीडियावरील वावर कमी आहे. तसंच त्या खऱ्या आयुष्यातही प्रचंड साधेपणाने राहतात.(फोटो इन्स्टाग्राम)
8 / 8
कविता आणि समीर या जोडीकडे पाहिलं की साधी राहणी उच्चविचारसरणी या युक्तीची प्रचिती येते.(फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :समीर चौगुलेमहाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकार