Join us
Daily Top 2Weekly Top 5

"गुगल केलं आणि..." माधुरीसोबत लग्नाचा विचार नव्हता, पण 'त्या' गोष्टीनं डॉ. नेनेंचा निर्णय बदलला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 17:53 IST

1 / 9
बॉलिवूडमधील असे एक कपल जे कायम चर्चेत असतं. त्यातील एक म्हणजे 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि डॉक्टर श्रीराम नेने (Shriram Nene).
2 / 9
माधुरी दीक्षितने १९९९ मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं आणि त्यानंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली होती. त्यांना दोन मुलेदेखील आहेत. डॉ. श्रीराम नेने हे एक प्रसिद्ध हृदय शस्त्रक्रिया (cardio-thoracic surgeon) आणि आरोग्य तज्ञ आहेत.
3 / 9
पण, तुम्हाला माहितेय का? डॉ. श्रीराम नेने यांना सुरुवातीला सिनेविश्वातील अभिनेत्रीशी लग्न करायचं नव्हतं. याबद्दल डॉ. नेनेंनी 'गुगल फायरसाईड'शी बोलताना सांगितलं.
4 / 9
डॉ. श्रीराम नेने यांचं बालपण लॉस एंजेलिसमध्येमध्ये गेलं होतं आणि पुढे हार्ट सर्जन झाल्यावर अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींना ते प्रत्यक्ष भेटले होते. त्यामुळं हॉलिवूड कलाकारांबद्दलचं त्यांचं मत फारचं काही चांगलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी अभिनेत्रीशी लग्न करायचं नाही, असं ठरवलं होतं.
5 / 9
पण, लग्नाचा विचार सुरू असताना श्रीराम नेने यांची भेट माधुरी दीक्षितच्या भावाशी झाली. पहिल्याचं भेटीत माधुरीच्या भावाचा साधेपणा डॉ नेने यांना भावला आणि मग ते माधुरीला भेटायला तयार झाले होते.
6 / 9
लग्नासाठी माधुरीला भेटायला तयार झाल्यानंतर डॉ. नेने यांनी पहिल्यांदा तिचं नाव गुगल केलं होतं आणि माधुरीबद्दल जाणून घेतलं होतं.
7 / 9
माधुरी दीक्षित आणि डॉ. नेने यांची पहिली भेट हाच त्यांच्या लव्हस्टोरीचा टर्निंग पॉईंट ठरला. माधुरीचं साधेपण, नम्रता पाहून डॉ. नेने यांचं मन बदललं आणि त्यांनी माधुरीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
8 / 9
डॉ. नेने यांनी सांगितलं की, 'माधुरीला पहिल्यांदा पाहिल्यावर मला काय बोलावं हे सुचत नव्हतं. प्रचंड शांत, अजिबात कसलाच गर्व नव्हता. मोठेपणा नाही, माणुसकीला खूपच चांगली. फिल्मी क्षेत्रात काम करूनही तिच्यातलं माणूसपण तिने जपलं होतं. तिचा स्वभाव मला प्रचंड भावला आणि मी तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला'.
9 / 9
आज माधुरी आणि डॉ. नेने एक आयडियल कपल म्हणून ओळखलं जातं. अनेकदा ते सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे खास क्षणही शेअर करत असतात.
टॅग्स :माधुरी दिक्षितसेलिब्रिटीबॉलिवूड