Join us  

PHOTOS : सुपरस्टार विजय देवरकोंडा इव्हेंटमध्ये स्लीपर घालून आला.., त्याच्यापुढे रणवीरही फिका...!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 3:15 PM

1 / 8
सादगी में भी कयामत की अदा होती है..., कुण्या एका शायरने कुण्या एका सौंदर्यवतीसाठी म्हटलेलं हे वाक्य सध्या साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडाला तंतोतंत लागू पडतंय.
2 / 8
होय, ‘लाइगर’या आपल्या पहिल्याच हिंदी चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजसाठी विजय देवरकोंडा मुंबईत आला आणि त्याच्या साधेपणाने सर्वांची मनं जिंकलीत.
3 / 8
‘लाइगर’मध्ये विजय देवरकोंडा लीड रोलमध्ये आहे. त्यामुळे हिरोची एन्ट्री झक्कास व्हायला हवी. पण विजय देवरकोंडा या इव्हेंटमध्ये आला तो साधं टी-शर्ट-ट्राऊझर आणि स्लीपर घालून.
4 / 8
‘लाइगर’च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये रणवीर सिंग स्पेशल गेस्ट म्हणून हजर होता. पण विजय देवरकोंडाच्या साधेपणासमोर रणवीरही फिका पडला.
5 / 8
रणवीर नेहमीप्रमाणे त्याच्या स्टाईलमध्ये होता आणि विजय देवरकोंडा साध्या टी-शर्टमध्ये. पण तरिही तोच भाव खाऊन गेला.
6 / 8
अगदी रणवीरला विजय देवरकोंडामुळे असुरक्षित वाटू लागलं. इतकं की, इव्हेंट संपताच स्टेजच्या मागे जात दोघांनी कपड्यांची अदलाबदल केली. रणवीरने विजयची टी-शर्ट झातली आणि विजयने रणवीरची जॅकेट.
7 / 8
साऊथचे कलाकार विनाकारण मिरवत नाही, हे पुन्हा एकदा या इव्हेंटच्या निमित्ताने दिसून आलं. रजनीकांत कायम आपल्या चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये विनामेकअप जातात. हाच कित्ता विजय देवरकोंडानेही गिरवला.
8 / 8
विजय देवरकोंडाच्या ‘लाइगर’ या चित्रपटाबद्दल सांगायचं तर हा चित्रपट हिंदीतही रिलीज होणार आहे. येत्या 25 ऑगस्टला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धडकणार आहे.
टॅग्स :विजय देवरकोंडारणवीर सिंगअनन्या पांडेबॉलिवूडTollywood