Join us  

"माझ्या बायकोला कळलं तर मला मारून टाकेल..."; केएल राहुलने अथियापासून लपवली 'ही' गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2024 8:54 PM

1 / 6
KL Rahul wife Athiya Shetty: भारतीय संघाचा उपकर्णधार केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी यांनी काही महिन्यांपूर्वीच लग्नगाठ बांधली. सध्या सेलिब्रिटींमध्ये हे कपल खूपच लोकप्रिय आहे.
2 / 6
एका खाजगी सोहळ्यात राहुल आणि अथिया ही जोडी लग्नबंधनात अडकली. पत्नी अथिया ही माझी सपोर्ट सिस्टम आहे असे राहुल कायम म्हणत असतो.
3 / 6
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्याने या गोष्टीचा पुनरुच्चार केला. तो म्हणाला की, माझ्या दुखापतीनंतर क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी मला माझ्या बायकोनेच प्रोत्साहन दिले.
4 / 6
दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या कसोटीत भारताला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. पण राहुलने मात्र आपली झुंजार खेळी करत शतक ठोकले.
5 / 6
या शतकी खेळीबाबत मुलाखतीत बोलताना, त्याने आपल्या पत्नीकडून मिळणाऱ्या सपोर्टला याचे श्रेय दिले. पण सोबतच, तिला माहिती नसलेली एक बाब राहुलने सांगितली जी तिला कळली तर ती त्याला मारून टाकेल असं तो मस्करीत म्हणाला.
6 / 6
माझी पत्नी अथिया शेट्टी कायम माझ्याबद्दल विचार करत असते आणि मला कायम सपोर्ट करत असते. पण मी जेव्हा मैदानात खेळायला उतरतो तेव्हा मात्र मी तिचा अजिबात विचार करत नसतो. माझं लक्ष फक्त खेळावर असतं, मला त्या वेळेत तिचा विसर पडतो. आता तिला हे कळलं तर तिला मला मारून टाकेल, असे मजेशीर पद्धतीने केएल राहुल म्हणाला.
टॅग्स :लोकेश राहुलअथिया शेट्टी भारतबॉलिवूडपती- जोडीदार