कतरिना कैफची बहीण इसाबेलचा डेब्यू अखेर ठरला, पाहा फर्स्ट लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 08:00 IST
1 / 10ठरलं तर, कतरिना कैफची बहीण इसाबेल कैफचा डेब्यू अखेर ठरला. होय, इसाबेलने तिच्या डेब्यू सिनेमाचे दोन पोस्टर शेअर करत ही माहिती दिली.2 / 10‘सुस्वागतम खुशामदीन’ या सिनेमातून इसाबेल डेब्यू करतेय.3 / 10या सिनेमात ती अभिनेता पुलकित सम्राटसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.4 / 10सिनेमात पुलकीत अमन नावाचे पात्र साकारणार आहे आणि इसाबेल आग-यात राहणा-या नूरची भूमिका साकारणार आहे.5 / 10 गेल्या अनेक दिवसांपासून इसाबेल कैफच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा होती. मात्र तिच्या बॉलिवूड डेब्यूला मुहूर्त सापडत नव्हता अखेर तो सापडला आहे.6 / 10याआधी इसाबेल ‘टाईम टू डान्स’ या सिनेमातून डेब्यू करणार अशी चर्चा होती. यात सूरज पांचोली तिचा हिरो म्हणून दिसणार होता.7 / 10या सिनेमाचे शूटींग सुरु झाल्याचीही खबर होती. मात्र तूर्तास या चित्रपटाबद्दल काहीही अपडेट नाहीत.8 / 10 सलमानने म्हणे मेकर्सला या चित्रपटाचा एक मोठा भाग नव्याने शूट करण्याचे आदेश दिलेत. चित्रपटाची कथा ज्यापद्धतीने पडद्यावर रेखाटली गेली, ती सलमानला आवडली नसल्याची माहिती होती. कदाचित याचमुळे इसाबेलचा डेब्यू रखडला होता. 9 / 102019 मध्ये इसाबेलने ‘क्वाथा’ नावाच्या सिनेमाची घोषणा केली होती. यात सलमानचा मेहुणा आयुष शर्मा दिसणार आहे. तिचा हा सिनेमा यावर्षी रिलीज होईल अशी अपेक्षा आहे.10 / 10अलीकडे इसाबेल ‘माशाल्लाह’ या पंजाबी गाण्याच्या व्हिडीओत दिसली होती.