MMS लीक ते शाहिद कपूरसोबत लिपलॉक; पतौडी खानदानाच्या सुनबाईंची कॉन्ट्रोवर्सी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 13:17 IST
1 / 7बॉलिवूडची बेबो अर्थात अभिनेत्री करीना कपूर-खान आज तिचा ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या करीना सैफ आणि तिच्या तैमुर, जहांगीर या दोन मुलांसोबत मालदीवमध्ये बर्थ डे सेलिब्रेशन करत आहे. करीना कलाविश्वासह तिच्या पर्सनल लाइफविषयीदेखील खुलेपणाने व्यक्त होत असते. त्यामुळे सोशल मीडियावर कायमच तिची चर्चा असते.2 / 7अफेअरपासून ते प्रेग्नंसीपर्यंत अनेक गोष्टींवर करीना सोशल मीडियावर व्यक्त झाली आहे. त्यामुळेच आज आपण करीनाशी निगडीत अशा काही कॉन्ट्रोवर्सीज जाणून घेणार आहोत ज्या कदाचित काही नेटकऱ्यांना ठावूक नसतील.3 / 7काही वर्षांपूर्वी अभिनेत्री करीना कपूरचा एक MMS लीक झाला होता. चित्रपटाचं चित्रीकरण संपल्यानंतर आपल्या रूममध्ये करीना कपडे बदलत असतानाचा हा व्हिडीओ होता. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. 4 / 7अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न करण्यापूर्वी करीना, शाहिद कपूरला डेट करत होती हे साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, शाहिद आणि करीनाचा एक लिपलॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. परंतु, हा व्हिडीओ फेक असल्याचं करीना- शाहिदने म्हटलं होतं. 5 / 7जुनं सारं विसरुन करीना आता तिच्या आयुष्यात बरीच पुढे निघून गेली आहे. सैफ अली खानसोबत लग्नगाठ बांधलेल्या करीनाला दोन मुलं असून तैमुर आणि जहांगीर अशी त्यांची नावं आहेत. 6 / 7तर दुसरीकडे शाहिद कपूरनेदेखील मीरा राजपूतसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्याला देखील दोन मुलं असून मीशा आणि झैन अशी त्यांची नावं आहेत.7 / 7 करीना लवकरच लाल सिंह चड्ढा या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता आमिर खान स्क्रीन शेअर करणार आहे.