1 / 9कंगना राणौतच्या मुंबईतील ऑफिसवर कारवाई करत बीएमसीने सप्टेंबर 2020 मध्ये ते तोडले होते. आत्ता तिच्या या ऑफिसमध्ये नुतनीकरणाचे काम सुरु आहे.2 / 9आज कंगनाने मुंबईतील या ऑफिसला भेट देत, तेथे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.3 / 9यादरम्यानचे कंगनाचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.4 / 9या फोटोंमध्ये कंगना व्हाईट कलरच्या ड्रेसमध्ये आहेत आणि नेहमीप्रमाणे ती शानदार दिसतेय.5 / 99 सप्टेंबर 2020 रोजी बीएमसीने कंगनाचे हे ऑफिस तोडले होते. हे ऑफिस अनधिकृत असल्याचे सांगत ही कारवाई करण्यात आली होती.6 / 9ऑफिस तोडल्यानंतर कंगना जाम भडकली होती. महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर तिने जबरदस्त भडास काढली होती.7 / 9 मुंबईतील कार्यालयावर महापालिकेचा हातोडा पडल्यावर कंगनाने आधी आपल्या ऑफिसला राम मंदिराची उपमा देत बीएमसीची तुलना बाबराशी केली, नंतर तिने थेट पाकिस्तान असे लिहित लोकशाहीची हत्या झाल्याचा घणाघात केला होता.8 / 9मणिकर्णिका फिल्म्सच्या कार्यालयात पहिला चित्रपट ‘अयोध्या’ जाहीर झाला. माझ्यासाठी ही इमारत नाही, तर एक राम मंदिर आहे, आज बाबर तिथे आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होईल. पुन्हा राम मंदिर पाडले जाईल. पण बाबर, हे लक्षात ठेव, हे मंदिर पुन्हा बांधले जाईल, हे मंदिर पुन्हा बांधले जाईल, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, असे ट्वीट कंगनाने केले होते.9 / 9यानंतर कंगनाने हायकोर्टात धाव घेत 2 कोटी रूपयांची नुकसानभरपाई मागितली होती.