कंगना राणौतचा हा लूक पाहुन आठवेल ७० च्या दशकाचा काळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2018 16:22 IST
1 / 5बॉलिवूडची क्विन कंगना राणौत जितकी प्रतिभावान अभिनेत्री आहे, तितकीच मोठी फॅशन आयकॉनही आहे. तिची स्टाईल अनेकदा वेड लावते. काल एअरपोर्टवर कंगना अशा काही अंदाजात दिसली की, सगळे जण तिच्याकडे अक्षरश: बघत राहिलेत.2 / 5गुलाबी साडीत ती एअरपोर्टवर दिसली. सेलिब्रिटी स्टाईलिस्ट अमी पटेलची सहकारी मधुरैया क्रिएशन्सच्या या साडीला कंगनाने असे काही कॅरी केले की, सगळेच घायाळ झालेत. कंगनाच्या या साडीवर फेमिनिस्म आणि फिअर्ससारखे बोल्ड शब्द लिहिलेले होते.3 / 5 या साडीशिवाय सर्वाधिक लक्षवेधी ठरली ती कंगनाच्या मॅचिंग रिबन. दोन वेण्या, त्याला पिंक रिबन, पिंक साडी, डोळ्यांवर गॉगल अशा कंगनाला पाहून अनेकांना ७० च्या दशकातील जुन्या नट्या आठवल्या नसतील तर नवल.4 / 5 साडीसोबत कंगनाने प्रिन्टेड ब्लाऊज कॅरी केले होते. तिचा हा रेट्रो लूक पाहून अनेकजण फिदा झालेत.5 / 5 साडीसोबत कंगनाने प्रिन्टेड ब्लाऊज कॅरी केले होते. तिचा हा रेट्रो लूक पाहून अनेकजण फिदा झालेत.