Join us  

PHOTOS: ही ‘अप्सरा’ डोळ्यांनीच करेल ‘खतम’...; राम गोपाल वर्मा यांनी केले सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 1:27 PM

1 / 11
होय,ही ‘अप्सरा’ डोळ्यांनीच घेऊ शकते जीव. अर्थात हे आम्ही नाही तर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी म्हटलेय.
2 / 11
बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा लवकरच ‘डी कंपनी’ नवाचा चित्रपट घेवून येत आहेत. हा चित्रपट कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या जीवनावर अधारित आहे.
3 / 11
या चित्रपटातील बहुचर्चित ‘खतम’ हे गाणे नुकतेच रिलीज झाले. या गाण्याचा प्रोमो शेअर करताना, राम गोपाल वर्मा यांनी केलेले ट्विट सध्या चर्चेत आहे. ‘अप्सरा राणीच्या हातातील चाकूने जीव जाईल, असे नाही. तिच्या डोळ्यांनीही एखाद्याचा जीव जाऊ शकतो...,’ असे ट्विट त्यांनी केले आहे.
4 / 11
‘डी कंपनी’त अप्सरा राणी नावाची हिरोईन आहे आणि खतम या गाण्यावर तिने जबरदस्त डान्स केला आहे.
5 / 11
राम गोपाल वर्मा यांच्याच ‘थ्रीलर’ या सिनेमातून अप्सरा राणीने बॉलिवूड डेब्यू केला होता.
6 / 11
त्यावेळी राम गोपाल वर्मा यांनी अप्सरा राणीचे एका पाठोपाठ एक असे आठ फोटो शेअर केले होते आणि या फोटोंनी चाहत्यांना वेड लावले होते.
7 / 11
यानंतर अप्सराचे केवळ 7 तासांत 10 हजार फॉलोअर्स वाढले होते.
8 / 11
राम गोपाल वर्मा यांचे मानाल तर अप्सराही ही एक उत्तम डान्सर आहे त्यापेक्षा उत्तम अभिनेत्री आहे.
9 / 11
अप्सरा राणी दुसरी कुणी नसून तेलगू अभिनेत्री अंकेता महाराणा आहे. तेलगू इंडस्ट्रीतील ती एक ओळखीचा चेहरा आहे.
10 / 11
अप्सराही ओडिशाची आहे. आोडिशात तिचा जन्म झाला. ती लहानाची मोठी झाली ती डेहराडून येथे.
11 / 11
सध्या अप्सरा हैदराबादेत राहते. याआधी ऊलाला ऊलाला व फोर लेटर्स या सिनेमांत तिने काम केलेय.
टॅग्स :राम गोपाल वर्मा