नितीश कुमार सरकारने बिहारात दारूबंदी करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. ऋषी कपूर यांनी या निर्णयावर एकापाठोपाठ एक असे अनेक टिष्ट्वट करून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘जगात सर्वच ठिकाणी दारूबंदीचे प्रयत्न फसले. दारूबंदीच्या निर्णयामुळे बिहारात स्मगलिंग, काळाबाजार वाढेल. शिवाय सरकारचा ३ हजार कोटींचा महसूलही बुडेल. तेव्हा जागे व्हा’असे एक टिष्ट्वट त्यांनी केले आहे. दारूचा साठा करणाºयांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची
शिक्षा देण्याची तरतूद बिहारच्या कायद्यात करण्यात आली आहे. यावरही ऋषी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.‘ दारूचा साठा करणाºयांना १० वर्षांची कैद आणि बेकायदा शस्त्र बाळगणाºयांना ५ वर्षे शिक्षा! वाह, नितीश,’असे दुसरे टिष्ट्वटही त्यांनी केले आहे.