Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाआधी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती हृता दुर्गुळे; म्हणाली, "सासू आणि नवऱ्यासोबत..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 15:08 IST

1 / 8
हृता दुर्गुळे (Hruta Durgule) प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री. 'फुलपाखरु' मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. तसंच तिची 'मन उडू उडू झालं' मालिकाही गाजली.
2 / 8
हृताचं निरागस सौंदर्य प्रेमात पाडणारं आहे. तिच्या सुंदरतेची नेहमीच स्तुती होत असते. दोन वर्षांपूर्वी हृता आणि प्रतीक शाह यांनी लग्नगाठ बांधली.
3 / 8
लग्नाआधी हृता प्रतीकसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. हे तिने अगदी मोकळेपणाने सांगितलं आहे. यावर नुकतीच तिने एका पॉडकास्टमध्ये प्रतिक्रिया दिली.
4 / 8
हृताचा नवरा प्रतीक शाह दिग्दर्शक आहे. त्याने अनेक हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. तर तिची सासूही अभिनेत्री आहे.
5 / 8
'मोटर माऊथ शो'ला दिलेल्या मुलाखतीत हृता म्हणाली, 'मी प्रतीक आणि सासूसोबत लग्नाआधी राहत होते. याचा माझ्या सासूलाच जास्त आनंद झाला होता. कारण ते दोघं किती वर्षांपासून एकत्र राहतच आहेत. माझ्या येण्याने त्यांना एक मैत्रीण मिळाली. मलाही त्यांच्या रुपात मैत्रीण मिळाली.
6 / 8
ती पुढे म्हणाली, 'या सगळ्यात माझ्या आईला जरा हे पटलं नव्हतं. एकत्र राहणार म्हणजे? असं तिने विचारलं होतं. पण आम्ही दोघंही टीव्ही इंडस्ट्रीत काम करत होतो. त्यामुळे दोघांचे शूटिंग १२ १२ तास असायचे. त्यामुळे प्रत्येक वेळी पॅकअप नंतर आम्हाला भेटायला वेळ मिळेलच असं शक्य नव्हतं. आम्ही एकमेकांना समजूनच घेऊ शकत नव्हतो. म्हणून मग मी त्याच्या घरी जाऊन राहायचं ठरवलं.'
7 / 8
पार्टनरसोबत भांडणं होण्यावर हृता म्हणाली, 'आमच्यात कमी वेळा भांडण होतं पण जेव्हा होतं तेव्हा ते टोकाचं असतं. आम्ही दोघंही वैयक्तिकरित्या खूप स्ट्राँग आहोत. त्यामुळे भांडण झाल्यानंतरचा जो वेळ असतो तो खूप विचित्र असतो. कारण कोणीच इगो सोडून एकमेकांशी बोलत नाही.'
8 / 8
हृता नुकतीच 'कमांडर करण सक्सेना' या हिंदी वेबसीरिजमध्ये दिसली. यात तिने गुरमीत चौधरीसोबत स्क्रीन शेअर केली. शिवाय तिचा 'कन्नी' हा मराठी सिनेमाही त्याआधी रिलीज झाला होता.
टॅग्स :ऋता दूर्गुळेमराठी अभिनेतालग्न