कॅरी फिशर आपल्या बोल्ड आणि बिंदास अंदाजासाठी ओळखली जात होती
‘टेलिग्राफ डॉट कॉ डॉट यूके’ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार कॅरीच्या निधनाच्या वृत्तास तिच्या मुलीने दुजोरा दिला आहे. २३ डिसेंबर रोजी आपल्या नव्या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी कॅरी लंडनहून लॉस एंजेलिस येथे जात होती. विमान लॅण्डिंग करीत असण्याच्या १५ मिनिटे अगोदर तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. यामुळे तिला तातडीने आयसीयूमध्ये दाखल करावे लागले. ऐन ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागल्याने तिची आई अभिनेत्री डेबी रेनॉल्ड्स आणि तिचे जवळचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये तिच्याजवळ होते.
लेखिका म्हणूनही कॅरीने ओळख निर्माण केली होती
तिची प्रकृती सातत्याने खालावत असल्याने सगळ्यांकडून चिंता व्यक्त केली जात होती. अखेर गेल्या मंगळवारी तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. सकाळी ८ वाजून ५५ मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेत या जगाचा निरोप घेतला. कॅरीच्या परिवाराच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्हाला सांगण्यास अत्यंत वाईट वाटत आहे की, कॅरी आपल्यात नाही. कॅरीच्या निधनास तिची मुलगी बिली लाउर्ड हिने दुजोरा दिला असून, आम्ही सगळेच तिच्यावर आजही प्रेम करीत आहोत. तिच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी तिच्या फॅन्सकडून केल्या जात असलेल्या प्रार्थनेसाठी आम्ही ऋणी आहोत असेही तिने सांगितले.
स्टार वार्सच्या आठव्या सीरिजमध्ये तिने प्रिसेंजची भूमिका साकारली होती
तर कॅरी फिशर हिची आई रेनॉल्डस (८४) हिने म्हटले की, माझी मुलगी प्रतिभावान होती. तिने स्वत:च्या हिमतीवर नाव कमावले होते. तिच्यावर आम्ही कायम प्रेम करणार आहोत. ती आमच्यात नाही याविषयी आमचा विश्वासच बसत नसल्याचेही रेनॉल्डस यांनी सांगितले.