७० व्या कान्सच्या रेड कार्पेटवर सध्या जगभरातील सौंदर्य अवतरल्याने जणू काही अप्सराच जमिनीवर आल्याचे दिसत आहे. मॉडेल बेला हदीददेखील अशाच काहीशा अंदाजात रेड कार्पेटवर उतरली होती. बेलाचे सौंदर्य बघून शेकडोच्या संख्येने कॅमेरे तिच्या दिशेने वळले. यावेळी बेलाने अॅलेक्झेड्रा व्हेदूअर याने डिझायन केलेला स्ट्रॅपलेस गाउन घातला होता. या गाउनमध्ये बेला तिचे सेक्सी पाय प्लान्ट करताना दिसून आली.
काही वेळानंतर हा गाउन तिच्या शरीरावरून खाली घसरत असल्याचे तिच्या लक्षात आले. असे पहिल्यांदाच घडले की, एखाद्या सुपरमॉडेलची न्यूड अंडरवियर दिसली अन् ती वार्डरोब माल्फंक्शनची बळी ठरली. बेलाने या ड्रेसवर ओल्गाना पॅरिसचे सॅण्डल घातलेले होते.
गेल्या वर्षीच्या कान्समध्येही बेला हदीदला उप्स मोमेंटचा सामना करावा लागला होता.
तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, बेलाचे वय केवळ २० वर्षे आहे. रेड कार्पेटवर बेला तिच्या वडिलांसोबत बघावयास मिळाली. गेल्यावर्षीदेखील बेला कान्समध्ये सहभागी झाली होती. त्यावेळीदेखील तिला उप्स मोमेंटचा सामना करावा लागला होता. परंतु यामुळे बेलामधील आत्मविश्वास किंचितही खसलेला दिसला नाही. तिने स्वत:ला सावरत आपल्या सौंदर्याची जादू सर्वदूर पसरविली.