प्रियंका चोपडा
‘बेवॉच’चे समर पोस्टर्स नुकतेच रिलिज करण्यात आले आहे. ज्यामध्ये प्रियंकाचे स्वतंत्र पोस्टर्स रिलिज करून तिला महत्त्व दिले खरे परंतु बोल्डनेसमध्ये ती इतर स्टार्सच्या तुलनेत फारशी सरस दिसत नसल्याचेच दिसून येत आहे. प्रियंका पोस्टरमध्ये व्हाइट कलरच्या ड्रेसमध्ये आइस लोकेशनवर उभी असल्याचे दिसत आहे. यापूर्वीदेखील लूक रिव्हीलच्या वेळी याच ड्रेसमध्ये ती झळकली होती. त्यामुळे तिचे हे समर पोस्टर्स तिच्या फॅन्ससाठी अजिबात वेगळ्या प्रकारचे फिलिंग्ज देणारे ठरले नाही.
केली रोहरबच
मात्र तिच्या तुलनेत तिचे को-फिमेल स्टार्स जबरदस्त हॉट अॅण्ड सेक्सी दिसत आहेत. कारण या पोस्टर्समध्ये केवळ प्रियंकाच व्हाइट ड्रेसमध्ये झळकली आहे, तर इतर सर्व स्टासकास्ट रेड ड्रेसमध्ये झळकत आहे. अलेक्जेन्ड्रा, केली आणि इल्फनेश या फिमेल स्टार्स बिकिनीमध्ये दिसत असल्याने त्यांनी बोल्डनेसचा अक्षरश: तडका लावला आहे. त्यामुळे प्रियंका चोपडा त्यांच्या तुलनेत कुठेच प्रभावी दिसत नसल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
अलेक्झेन्ड्रा ददारिओ
दरम्यान हे सर्व पोस्टर्स "Don't worry, summer is coming-Baywatch" या टॅगलाइनने रिलिज करण्यात आले आहेत. फिमेल स्टारकास्टबरोबरच ड्वेन जॉन्सन, जॅक अफ्रॉन आणि जॉन बॅस हे सुद्धा समर पोस्टर्सवर झळकत आहेत. हा सिनेमा लवकरच रिलिज होणार आहे.