त्याचे झाले असे की, पेरिस गेल्या रविवारी हॉलिवूड ब्यूटि अवॉर्डसमध्ये पोहचली होती. सोहळ्यात पेरिसचा जलवा बघण्यासारखा होता. तिने डिझायनर अगस्त गेट्टी यांच्या मिलियन डॉलर कलेक्शनमधील गाउन परिधान केला होता. या गाउनची किंमत अनेकांना भोवळ आणणारी होती. तब्बल २७० हजार डॉलर किमतीचा (१.८ कोटी रुपये) हा सिल्व्हर गाउन तिच्यावर शोभून दिसत होता. डीप नेक असलेल्या या गाउनमध्ये पेरिसने सोहळ्यात चारचॉँद लावले होते.
परंतु हा गाउन सांभाळणे तिला खूपच अवघड जात होते. त्यातच तिच्या चहुबाजूंनी मीडियाचे कॅमेरे असल्याने ती आणखी अनकर्म्फट दिसत होती. ती वारंवार ड्रेसला अॅडजेस्ट करताना दिसत होती. मात्र गंमत तेव्हा झाली जेव्हा हा गाउन तिच्या हिल्समध्ये अडकला होता. तिला खाली बसून हिल्समधून गाउन काढावा लागला. मात्र यामुळे तिची चांगलीच फजिती झाली. तब्बल अडीच मिनिटे चाललेला हा संपूर्ण प्रकार माध्यमांच्या कॅमेºयात कैद झाला. जेव्हा पेरिसला ही बाब समजली तेव्हा मात्र ती खूपच अपसेट झाली. परंतु पेरिससोबत असा प्रसंग पहिल्यांदाच घडला असे नाही, तर यापूर्वीदेखील तिला अशा प्रसंगाचा सामना करावा लागला होता.