असे म्हटले जाते की, जस्टिन बीबर खूपच उद्धट गायक आहे. खरं तर हे त्याने त्याच्या स्वभावातून दाखवून दिले आहे. सोशल मीडियावर जेव्हा त्याने त्याला न्यूड फोटो अपलोड केला होता तेव्हा एकच कल्लोळ झाला होता. हातात गिटार घेऊन जस्टिनचा हा न्यूड फोटो बघून त्याच्या फॅन्सला धक्का बसला होता. या फोटोमध्ये त्याची आजीही बघावयास मिळत आहे.
जस्टिन बीबरला कॉन्ट्रोव्हर्सी किंग असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. त्याच्यातील उद्धटपणा परिसीमा तेव्हा ओलांडली गेली जेव्हा तो त्याचा मित्र शॅरिफ एक मुलीसोबत आपत्तीजनक स्थितीत बघावयास मिळाला होता. त्याचे हे फोटो त्यावेळी प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले होते. त्याकाळी बीबर सर्वत्र टीकेचा धनीही ठरला होता.
नशेत वाद घालण्यात बीबरचा कोणीच हात पकडू शकत नाही. कारण तो ज्या पबमध्ये मद्यपान करण्यासाठी जातो त्याठिकाणी हमखासपणे वाद निर्माण होतो. बºयाचशा ठिकाणी त्याने नशेच्या भरात पबमधील कर्मचाºयांना मारहाण केली आहे.
जस्टिन त्याच्या गर्लफ्रेण्डवरूनही नेहमीच वादात असतो. कारण त्याच्या गर्लफ्रेण्डची संख्या प्रचंड असून, आतापर्यंत कित्येक मॉडेलशी त्याचे नाव जोडले गेले आहे. जेव्हा त्याला गर्लफ्रेण्ड रिचीसोबत पब्लिक प्लेसमध्ये सेक्स करताना बघण्यात आले, तेव्हा सगळ्यांचीच बोलती बंद झाली होती.