जेनिफरने बॉयफ्रेंड ड्रेक याच्यासोबतच्या संबंधाचा खुलासा करण्यासाठी एक फोटो शेअर केला आहे. फोटो बघून दोघांमधील संबंध लगेचच अधोरेखित होतात. मात्र असे असतानाही काहींच्या मनात दोघांमधील संबंधाविषयी शंका आहेत. ते दोघे खरच एकमेकांना डेट करीत आहेत का?, दोघांमध्ये खरोखरच प्रेमसंबंध आहेत का? अशा प्रकारच्या शंका त्यांच्याकडून उपस्थित केल्या जात आहेत.
डेलीमेल डॉट कॉ डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या बुधवारी सकाळीच दोघांनीही त्यांचा हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जेनिफरने (४७) सर्वात अगोदर हा फोटो शेअर केला. त्यानंतर ड्रेकने (३०) फोटो शेअर केला. फोटोमध्ये ड्रेक जेनिफरला मिठी मारत असून, एक डोळा बंद करून तो कॅमेºयाकडे बघत आहे,
तर फोटोत जेनिफरच्या चेहºयावरील भाव आनंदी दिसत असून, तिचे दोन्ही डोळे बंद आहेत. दोघांच्या नात्याविषयीची चर्चा तेव्हा सुरू झाली जेव्हा लास वेगासमध्ये जेनिफरच्या कार्यक्रमात ड्रेक जातीने उपस्थित होता. लगातार दोन कार्यक्रमांमध्ये त्याने लावलेली उपस्थिती फॅन्सच्या मनात चलबिचल निर्माण करणारी होती.