By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 15:48 IST
1 / 8अभिनेता रणवीर सिंहच्या फॅशनची अनेकदा चर्चा होते. काहींना त्याचं कौतुक वाटतं, तर काही जण त्याच्यावर टीकाही करतात. रणवीर सारखाच फॅशन सेन्स असलेला आणखी एक जण ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात पाहायला मिळाला. त्याचं नाव बिली पॉर्टर.2 / 8अमेरिकन पॉप सिंगर, स्टेज परफॉर्मर आणि अभिनेता बिली पॉर्टर ऑस्कर सोहळ्याला गाऊन घालून आला होता. त्याच्या हटके लूकची संपूर्ण सोहळ्यात चर्चा होती. 3 / 8बिलीचा जलवा लक्षवेधी ठरला. त्यानं स्वत:चा फोटो सोशल मीडियावरदेखील शेअर केला. 'जेव्हा तुम्ही ऑस्करला जातो, तेव्हा तुम्हाला व्यवस्थित तयार होऊन जायला हवं,' अशी ओळ त्यानं फोटोसोबत पोस्ट केली. 4 / 8बिलीनं लक्षवेधी ड्रेससाठी त्याच्या डिझायनरचे आभार मानले. ख्रिस्टियन सिनिआनोनं हा ड्रेस डिझाईन केला होता. 5 / 8बिलीचा भन्नाट ड्रेस अनेकांना रणवीर सिंहची आठवण झाली. त्यामुळे पुरस्कार विजेत्यांपेक्षा बिलीचं जास्त चर्चेत होता. 6 / 8खरंतर भारतात ऑस्करची फार चर्चा होत नाही. मात्र सोशल मीडियामध्ये ऑस्कर सोहळ्यातल्या बिलीची खूप चर्चा आहे. त्याचे फोटो प्रचंड वायरलदेखील झाले आहेत. 7 / 8मला खूप आधीपासून बॉल गाऊन घालायचा होता. ती इच्छा आज पूर्ण झाली, असं बिलीनं म्हटलं.8 / 8आपण न्यू यॉर्क फॅशन वीकपासून प्रेरणा घेत असल्याचंदेखील बिलीनं सांगितलं.