विन डिझेल याचा १८ जुलै १९६७ रोजी अमेरिकेतील, न्यू यॉर्क शहरात जन्म झाला आहे. त्याचे वडील इर्विंग विंसेंट हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता होते. त्याच्या आईचे नाव डेलोरा विंसेंट आहे. विनला दोन भाऊ आणि एक बहीण आहे. (सामंथा विंसेंट, पॉल विंसेंट, टिम विंसेंट) घरातूनच अभिनयाचा वारसा मिळालेल्या विनला लहानपणापासूनच हॉलिवूडचे आकर्षण होते. त्यामुळे त्याच्यातील अभिनयाची चुणूक कधीच लपून राहिली नाही. विनने २००७ मध्ये पालोमा जिमनेज़ हिच्याशी विवाह केला असून, त्याला हंरिले सिंक्लेयर, पॉलिने सिंक्लेयर, विन्सेंट सिंक्लेयर असे दोन मुली आणि एक मुलगा आहे.
विन डिझेलत्याच्या परिवारासमवेत
विन कॉलेज लाइफमध्ये तो थिएटर्सकडे आकर्षित झाला होता. मात्र त्याला अभिनेता होण्याबरोबरच एक प्रसिद्ध कथाकारदेखील व्हायचे होते. १९९० मध्ये विन हॉलिवूडमध्ये सक्रिय झाला. आपल्या हटके लुकमुळे तो काही काळातच प्रसिद्धी झोतात आला. त्याने ‘अवेकिंग’ या ड्रामा फिल्ममधून हॉलिवूडमध्ये डेब्यू केला. पुढे १९९४ मध्ये त्याने ‘मल्टी फेशियल’ या सिनेमात काम केले. त्यानंतर मात्र त्याच्याकडे सिनेमांच्या रांगा लागल्या.
विनच्या दूसरा ‘फेशियल’ या सिनेमातील प्रसंग
परंतु त्याच्या करिअरला खºया अर्थाने २००१ मध्ये कलाटणी मिळाली. कारण या वर्षात आलेल्या त्याच्या ‘फास्ट अॅण्ड फ्यूरियस’ या सिनेमा त्याला अॅक्शन हीरो म्हणून ओळख मिळाली. त्याचबरोबर या सिनेमाने त्याला ‘डॉमॅनिक टोरेंटो’ हे दुसरे नावही दिले. विनचे फास्ट अॅण्ड फ्यूरियस सिरिजमधील डॉमॅनिक टोरेंटो ही भूमिका जबरदस्त हिट आहे. पुढे तो २००२ मध्ये आलेल्या ‘ट्रिपल एक्स’ या सिनेमात जबरदस्त अॅक्शन करताना बघावयास मिळाला.
‘फास्ट अॅण्ड फ्यूरियस’ सिनेमातील प्रसंग
तेथून त्याचा हॉलिवूडमधील अॅक्शन हीरो असा प्रवास सुरू झाला. ‘विनचे फास्ट अॅण्ड फ्यूरियस’ आणि ‘ट्रिपल एक्स’ या सीरिजच्या जवळपास सर्वच सिनेमांनी हॉलिवूडच्या बॉक्स आॅफिसवर धूम उडवून दिली आहे. त्याचबरोबर या सिनेमांमुळे त्याला जगभरात लौकिकही मिळवून दिला आहे. फास्ट अॅण्ड फ्यूरियससाठी तर त्याला दोन वेळा ‘पिपल्स चॉइस’ या पुरस्काराने सन्मानितही केले आहे. त्याचबरोबर इतरही बºयाचशा प्रतिष्ठित पुरस्कारांवरही त्याने नाव कोरले आहे. विनचे आतापर्यंत चार व्हिडीओ गेम आले असल्याने तो बच्चे कंपनीचाही फेव्हरेट स्टार आहे.
‘पिपल्स चॉइस’ पुरस्काराने सन्मानित केल्याचा प्रसंग
सद्यस्थितीत विन हा हॉलिवूडचा सुपरस्टार असून, त्याचे जवळपास सर्वच सिनेमे बिग बजेट असून, ते जगभरातही धूम उडविणारे ठरत आहेत. सध्या तो त्याच्या आगामी ‘एक्सएक्सएक्स : दी रिटर्न आॅफ जेंडर केज’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी भारतात आलेला आहे. या सिनेमात बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोन त्याच्यासोबत प्रमुख भूमिकेत असल्याने, केवळ दीपिकाच्या आग्रहास्तव तो भारतात आलेला आहे. विशेष म्हणजे सर्वप्रथम हा सिनेमा भारतात रिलिज केला जाणार असल्याने बॉक्स आॅफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड नावे करून घेण्याची शक्यता आहे.
विनडिझेलआणि दीपिकाच्या आगामी ‘एक्सएक्सएक्स : द रिटर्न आॅफ जेंडर केज’ सिनेमाचे पोस्टर
विन डीजलचे सुपरहिट सिनिमे
‘एक्सएक्सएक्स’, ‘फास्ट अॅण्ड फ्यूरियस’, ‘गार्जियंस आॅफ द गॅलेक्सी’ हे त्याचे सुपरहिट सिनिमे असून, आतापर्यंत ३१ सिनेमांमध्ये त्याने कामे केली आहेत. त्याव्यतिरिक्त त्याच्या नावावर चार व्हिडीओ गेम आहेत.
विन डिझेलयाचा व्हिडीओ गेम