या फोटोंमधील तिचा लूक रिअॅलिटी टीव्ही स्टार किम कार्दशियन हिच्यासारखा दिसत असल्याने नेटिझन्सचे तिच्या फोटोला तुफान लाईक्स मिळत आहेत. काहींनी तर तिला किमची जुळी बहीण असे संबोधले असल्याने ती नक्कीच सातवे आस्मानपर असेल यात शंका नाही.
फोटोमध्ये कॅमिलाची फिजिक, फेस आणि स्टाइल हुबेहुब किमसारखी आहे. किमही सोशल मीडियावर नेहमीच तिचे फोटो अपलोड करीत असल्याने कॅमिलाचे फॅन्स तिचे फोटोज किमच्या फोटोबरोबर शेअर करीत आहेत.
२६ वर्षीय कॅमिला कॅनडातील प्रसिद्ध फॅशन ब्लॉगर आहे. तिच्या फॉलोअरची संख्या चार लाखांच्या घरात आहे. यावरुन तिच्या प्रसिद्धीचा अंदाज बांधता येतो. कॅमिला किमच्या स्टाइलमधील फोटोज शेअर करत असली, तरी यावर मी किमची कॉपी करत नाही, असे ती म्हणते. कॅमिला परफेक्ट फिगरचे श्रेय तिच्या पर्सनल ट्रेनरला देते. जो तिच्या फिटनेससोबत तिच्या हेल्दी डाएटकडेही लक्ष देतो.