ब्रॅड पिट यावेळचे ख्रिसमस कशा पद्धतीने सेलिब्रेट करणार याविषयी त्याच्या फॅन्समध्ये कमालीची उत्सुकता होती. त्यातच अॅँजेलिना जोली हिने पिटला मुलांपासून दूर राहण्याचा अगोदर इशारा दिल्याने तो ख्रिसमससाठी तरी मुलांना भेटू शकणार की नाही, असे बोलले जात होते. आता या सर्व चर्चेवर पूर्णविराम देण्यात आला असून, पिट मुलांसोबत ख्रिसमस सेलिब्रिशन करणार आहे. मात्र यासाठी त्याला केवळ चारच तास वेळ देण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अॅँजेलिनानेच पिटला मुलांना भेटू देण्यासाठीची परवानगी दिली आहे. तिच्या मते, जर मी पिटला मुलांपासून जास्त दिवस दूर ठेवले तर मुले मला कधीच माफ करणार नाहीत.
डेलिस्टार डॉट को डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुुसार, ब्रॅड पिटपासून दूर गेल्यानंतर अॅँजेलिनादेखील एकांतात राहणे पसंत करीत आहे. बºयाचवेळा ती रडत असते. त्यामुळेच तिने तिच्या विचारात बदल करीत ब्रॅडला मुलांना भेटण्याची परवानगी दिली असावी.
दरम्यान, मुलांना भेटायचे म्हणून पिटने खास शॉपिंगही केली असून, त्यामध्ये भरपूर गिफ्टचा समावेश असल्याचे समजते. त्यात अॅँजेलिनासाठी एखादे गिफ्ट आहे का? असा अंदाज त्याच्या फॅन्सकडून उपस्थित केला जात आहे.