Join us  

बंदुकीचा धाक दाखवत आफ्रिकेतील जंगलात 'या' अभिनेत्रीचं झालं होतं अपहरण आणि मग रात्रभर ठेवून....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 10:54 AM

1 / 13
ऑस्ट्रेलियन अभिनेत्री, रायटर, कॉमेडीअन आणि निर्माती रेबेल विल्सन आपल्या विनोदी भूमिकांसाठी आणि आपल्या इन्स्टाग्राम पोस्टसाठी हॉलिवूडमध्ये लोकप्रिय आहे. मात्र, तिने नुकताच तिच्यासोबत घडलेल्या अशा एका घटनेचा खुलासा केलाय जी फार कमी लोकांना माहीत आहे.
2 / 13
रेबेलने स्काय वन सीरीज स्ट्रेट टॉकिंगमध्ये दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना सांगितले की, एकदा आफ्रिकेत तिचं अपहरण झालं होतं. त्यावेळी ती मोजाम्बिक्यूच्या एका ग्रामीण भागात होती.
3 / 13
ती म्हणाली की, आम्ही एका ट्रकमध्ये बसलो होतो आणि मी पाहिले की, काही लोक दुसऱ्या ट्रकमधून हातात रायफल घेऊन येत आहेत. त्यांनी आमच्या ट्रकसमोर त्यांचा ट्रक थांबवला.
4 / 13
त्यांनी बंदुकी आमच्यावर रोखून म्हणाले की, तुम्हाला या ट्रकमधून उतरावं लागेल. आम्ही सगळे घाबरलेले होतो, त्यामुळे आम्ही त्याचं ऐकलं. ते लोक माझ्यासहीत सर्व लोकांना किडनॅपरच्या घरी घेऊन गेले.
5 / 13
अशातही रेबेलचं डोकं वेगाने चालत होतं. किडनॅपर्सनी रेबेल आणि सोबतच्या सर्व लोकांना खाली बसलवं. तेव्हा रेबेल त्यांना म्हणाली की, आपण सर्वांनी आपले हात एकमेकांशी कनेक्ट केले पाहिजे.
6 / 13
रेबेल म्हणाली की, मला वाटत होतं की, ते आमच्यापैकी एखाद्या मुलीला घेऊन जाऊ शकतात आणि तिची लैंगिक शोषण करू शकतात.
7 / 13
मात्र, सुवैदाने रेबेल आणि तिच्या मैत्रिणींचं नशीब चांगलं होतं. त्यांना कोणत्याही प्रकारचं नुकसान पोहोचवण्यात आलं नाही. त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या ट्रकपर्यंत नेऊन सोडण्यात आलं.
8 / 13
यानंतर त्यांनी आफ्रिका बॉर्डर पार केली आणि तेव्हा सुटकेचा निश्वास टाकला. रेबेलला वाटलं होतं की, त्या लोकांनी यांच्या ट्रकमध्ये काही बेकायदेशीर साहित्य टाकलं असू शकतं आणि आम्हाला किडनॅप करून त्यांना आमच्या माध्यमातून ते साहित्य पास करायचं असेल.
9 / 13
दरम्यान रेबेल काही दिवसांपूर्वी तिच्या जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशनमुळेही चर्चेत होती. रेबेलने २०२० मध्ये आपल्या फिटनेसवर फार मेहनत घेतली.
10 / 13
तिने आपल्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी खास प्रकारची डाएट घेणं सुरू केलं होतं. रेबेल हॉलिवूड स्टार्स असण्यासोबतच तिने ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रासोबतही काम केलं आहे.
11 / 13
12 / 13
13 / 13
टॅग्स :हॉलिवूडअपहरण